AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बागबान’ फेम अभिनेत्याला अ‍ॅम्ब्युलन्सने फरफटत नेलं, साहिल चढ्ढा रुग्णालयात

'बागबान' चित्रपटात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या मुलाची व्यक्तिरेखा अभिनेता साहिल चढ्ढा याने साकारली होती. (Actor Saahil Chadha Accident Ambulance)

'बागबान' फेम अभिनेत्याला अ‍ॅम्ब्युलन्सने फरफटत नेलं, साहिल चढ्ढा रुग्णालयात
Actor Saahil Chadha
| Updated on: May 17, 2021 | 9:12 AM
Share

मुंबई : ‘बागबान’ फेम अभिनेता साहिल चढ्ढा (Saahil Chadha) याला मुंबईत अपघात झाला. अ‍ॅम्ब्युलन्सने धडक देऊन साहिलला दोन फुटांपर्यंत फरफटत नेलं. यामुळे जखमी झालेल्या साहिल चढ्ढाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर साहिलची पत्नी प्रोमिला चढ्ढाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. (Baghban Fame Actor Saahil Chadha met with Accident in Mumbai as Ambulance Hits)

सेंट झेवियर्स कॉलेजजवळ अपघात

‘बागबान’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या मुलाची व्यक्तिरेखा अभिनेता साहिल चढ्ढा याने साकारली होती. बुधवारी साहिल आणि प्रोमिला एका मीटिंगनंतर घरी चालले होते. सेंट झेवियर्स कॉलेजच्या मागच्या गल्लीत पार्क केलेल्या गाडीकडे जाताना अॅम्ब्युलन्सने दोघांना धडक दिली. साहिल अ‍ॅम्ब्युलन्ससोबत जवळपास दोन फूट फरफटत गेला. त्यामुळे त्याच्या पोट आणि जांघांना जखम झाली. तर त्नी प्रोमिला चढ्ढाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

रुग्णवाहिकेचा वेग कमी असल्याने बचावला

साहिलला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर प्रोमिला तिच्या चुलत बहिणीसोबत राहत आहे. पुढच्या दोन-तीन दिवसांत साहिलला डिस्चार्ज मिळू शकेल. साहिलने ही घटना धक्कादायक आणि भयानक असल्याचं सांगितलं. ड्रायव्हर जास्त वेगाने रुग्णवाहिका चालवत नव्हता, त्यामुळे आपण वाचल्याचं तो सांगतो. त्याच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

देवाच्या कृपेने संकट टळल्याची भावना

“मी बौद्ध धर्माचे अनुसरण करतो आणि मला असे वाटते की माझ्या आयुष्यात एक मोठी आणि नकोशी घटना टळली आहे. माझ्यावर काही दिवस डॉक्टरांची देखरेख असेल. परंतु देवाची कृपा आहे. जे काही झाले ते अतिशय धक्कादायक आणि भयानक आहे” अशी प्रतिक्रिया साहिलने दिली.

ऑक्टोबर महिन्यात प्रोमिलाची कोरोनावर मात

साहिलची पत्नी प्रोमिला चढ्ढाला ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. यानंतर चढ्ढा दाम्पत्य सुमारे 20 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहिले. ‘बागबान’ व्यतिरिक्त साहिलने ‘थोड़ा लाईफ थोड़ा मॅजिक’ आणि ‘सेक्शन 275’ सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. (Actor Saahil Chadha Accident Ambulance)

संबंधित बातम्या :

Suyash Tilak | कॅबला मालवाहू कंटेनरची जोरदार धडक, अभिनेता सुयश टिळक थोडक्यात बचावला!

हिप्नोटाईज करुन 50 हजार लंपास, अभिनेता योगेश सोहोनीला लुटणारा दोन दिवसात गजाआड

(Baghban Fame Actor Saahil Chadha met with Accident in Mumbai as Ambulance Hits)

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.