ऐश्वर्यासोबत 11 जणांना पोलिसांनी केली अटक… दिग्दर्शकाला एका खोलीत नेलं आणि… धक्कादायक आहे प्रकरण

अभिनेत्री ऐश्वर्या हिच्यासोबत पोलिसांनी तब्बल 11 पोलिसांनी अटक केली आहे. एका दिग्दर्शकला एका खोलीत नेल्यानंतर असं काही केल्यामुळे खळबळ माजली आहे. सध्या या धक्कादायक प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

ऐश्वर्यासोबत 11 जणांना पोलिसांनी केली अटक... दिग्दर्शकाला एका खोलीत नेलं आणि... धक्कादायक आहे प्रकरण
| Updated on: Feb 27, 2026 | 10:49 AM

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सिनेमा दिग्दर्शक अनीश याचं अपहरण आणि हल्ल्या प्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी अभिनत्री ऐश्वर्या हिच्यासोबत 11 जणांना अटक केली आहे. संबंधित अपहरण आणि हल्ला प्रकरण धक्कादायक आहे. एका कन्नड चित्रपट दिग्दर्शकाचे कार विकण्याचं आमिष दाखवून अपहरण, क्रूर हल्ला आणि लुटमार केल्याचा आरोप आहे. अडुगोडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी अभिनेत्री ऐश्वर्यासह 11 आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित दिग्दर्शत एक मॉडलिंग आणि कास्टिंग एजेंसी चालवतोत आणि ‘जीवदा भाषा’ सिनेमाचं दिर्गदर्शन करत आहे.

9 फेब्रुवारी रोजी दिग्दर्शक बेंगळुरू येथे आला होता. जेव्हा त्याला सांगण्यात आलं की, एका खरेदीदाराला त्याची होंडा सीआरव्हीमध्ये खरेदी करायची आहे, तेव्हा चौकशीत असं दिसून आले की, त्याला शहराच्या बाहेरील एका घरात नेण्यात आलं होतं. जेथे मुख्य आरोपी आशीर्वाद याच्या नेतृत्वाखालील एका गटाने त्याच्यावर काठ्यांनी हल्ला केला आणि पैशाच्या व्यवहाराशी संबंधित मागील तक्रारी मागे घेण्याची मागणी केली.

संबंधित प्रकरण कथिर रित्या 2.5 कोटी रुपयांचं कर्ज आणि जवळपास 5 – 6 कोटी सिनेमात गुंतवणूक केल्याचं आहे. रिपोर्टनुसार, दिग्दर्शकाकडून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली, त्यानंतर दिग्दर्शकाला बळजबरी गाडीत बसवण्यात आलं आणि टोल परिसरात नेण्यात आलं..त्यानंतर दिग्दर्शकावर हल्ला केला. त्यानंतर कथित आरोपींनी दिग्दर्शकाच्या ATM चा वापर करत पैसे काढले आणि रुग्णालयात दाखल केलं.

तपासकर्त्यांना असाही संशय आहे की, पीडित दिग्दर्शकाच्या ओखळखीच्या लोकांनी आमिष दाखवलं होतं आणि हल्ल्यादरम्यान काही आरोपी त्याच्या संपर्कात होते. दिग्दर्शकाला अनेक जखमा झाल्या आहेत आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आणि प्रकरणातील आरोपींना अटक देखील केली आहे. पोलीस सर्व आरोपींची कसून चौकशी करत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची योजना आखली आहे आणि लवकरच सर्व तपशील उघड होतील. लाखो रुपयांच्या दरोडा आणि हल्ल्याचा समावेश असलेला हा खटला आता सोशल मीडियावर चर्चेत आहे.

 

Follow Us