‘इंसानों के रूप में जानवर हो तुम…’ भारती सिंग, तेजस्वी प्रकाशचा खेडका खातानाचा व्हिडीओ व्हायरल; युजर्स भडकले
भारती सिंग, तेजस्वी प्रकाश आणि देबिना बॅनर्जी यांचा खेकडा खातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ व्हिडिओमुळे या तिघीही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत. त्यांच्या या कृतीवर युजर्सनी तीव्र नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे.

कॉमेडियन भारती सिंग सध्या तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. भारती अनेकदा तिचा बेबी बंपला फ्लॉन्ट करताना दिसते. भारती सिंगबद्दल कधीच तेवढी नाकरात्मक चाहत्यांच्या मनात किंवा नेटकऱ्यांकडून पाहायला मिळाली नाही. तिच्या साधेपणाच, तिच्या मेहनतीचं लोकांनी कायम कौतुक केलं आहे. पण आता भारती सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. भारती सिंग, देबिना बॅनर्जी आणि तेजस्वी प्रकाश यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक संतापले. सोशल मीडियावरील बहुतेक युजर्स त्यांना ट्रोल करत आहेत.
टेबलावर वाढलेला खेकडा
व्हायरल व्हिडिओमध्ये भारती सिंग, देबिना बोनर्जी आणि तेजस्वी प्रकाश जेवणाच्या टेबलावर वेळ घालवताना दिसत आहेत. तथापि, त्यांच्या तिघांच्याही टेबलांवर खेकडे दिसत आहेत. या तिघीही खेकडे खाताना दिसत आहेत. ते एक भव्य पार्टी करत होते असं या व्हिडीओवर लक्षात येत आहे. तिघांनाच्याही प्लेटमध्ये मोठे खेकडे दिसत आहेत. तसेच ते खाण्यासाठी तेजस्वी खूप उत्साहित दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर येताच, युजर्स चांगलेच संतापले आणि त्यांनी तिघांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
युजर्ना कोणती गोष्ट खटकली?
भारती सिंग, देबिना बॅनर्जी आणि तेजस्वी प्रकाश यांच्या या व्हिडिओला आधीच बरेच व्ह्यूज मिळाले आहेत. युजर्स त्यावर सतत प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “किती दुःखद. मानवी रूपातील प्राणी आहात तुम्ही” दुसऱ्या युजरने कमेंट केली, “अरे! मला असे वाटले की कोणीतरी त्यांना असेच खाईल. कर्म नेहमीच समोर येतात.” दुसऱ्या युजरने लिहिले, “अरे, थू, खूप घृणास्पद.” तर एकाने लिहिले, “आधी ती प्रेमानंदजींना भेटायला गेली होती, आता ती प्राण्यांच्या हत्येचा आनंद घेत आहे.” अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत.
दरम्यान या व्हिडीओबाबत या तिघींपैकी कोणाही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्यांनी ज्यापद्धतीने खेकडे खाण्याचा आनंद घेतला आणि त्याचा व्हिडीओ काढला हे नक्कीच चाहत्यांना, नेटकऱ्यांना खटकलं आहे. त्यामुळे त्यांनी संतापाने या तिघींनाही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
