शमिताचं विजयी स्वप्न भंगलं, बिस बॉसमधून आऊट, दीपिका पदुकोनने दाखवला घरचा रस्ता

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: आयेशा सय्यद, Tv9 मराठी

Updated on: Jan 30, 2022 | 11:35 PM

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण शमिता शेट्टी अखेर बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडली आहे.

शमिताचं विजयी स्वप्न भंगलं, बिस बॉसमधून आऊट, दीपिका पदुकोनने दाखवला घरचा रस्ता
शमिता शेट्टी

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण शमिता शेट्टी (Shamita Shettuy is sister of Shilpa Shetty) अखेर बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. टॉप फोरपर्यंत असणाऱ्या असणाऱ्या शमिताचं बिगबॉस सीझन 15 वा जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. बिगबॉसमधून शमिता आऊट झाली आहे. गेहराईया (Gehraiya) सिनेमाच्या प्रमोशनसाठी आलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोणनं शमिताला घरचा रस्ता दाखवला आहे. टॉप फोर स्पर्धकांचा निकाल देताना दीपिकानं शमिता आऊट झाली असल्याचं जाहीर केलं. बिग बॉसच्या सीझन थ्रीमध्येही सामील झालेली शमिता शेट्टी ही अर्धावरच बाहेर पडली होती. त्यानंतर ओटीटी बिग बॉसमध्येही तिनं 2021 साली सहभाग घेतला होता. अखेर पंधराव्या बिगबॉसच्या सीझनमध्ये (Bigg Boss Season 15 Grand Finale) तिला पुन्हा एकदा घरात एन्ट्री मिळालेली. चांगला खेळ करत शमितानं फायनल पर्यंत मजल मारली होती. पण तिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास अखेर संपुष्टात आला असून तिचं बिग बॉसचा पंधरावा सीझन संपण्याचं स्वप्नही भंगलं आहे.

मोहब्बते सिनेमातून इन्ट्री ते बिगबॉसचा प्रवास

मोहब्बते सिनेमात इशिका धनराजगीरच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री म्हणजे शमिता शेट्टी. भारतीय अभिनेत्री म्हणून स्वतः नशीब आजमावण्यसाठी पुढे आलेली शमिता शेट्टी ही प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा फेब्रुवारी 1979रोजी झाला. मुंबईतल्या चेंबूरमध्ये जन्मलेल्या शमिताचं शिक्षणही चेंबूरमध्ये झालंय. आपल्या पहिल्याच सिनेमात केलेल्या अभिनयामुळे शमिताला आयफा बेस्ट डेब्यू अवॉर्डने सन्मानित करण्यात आला होता.

पहिल्या सिनेमात अभिनय केल्यानंतर शमितानं अनेक सिनेमात आयटम नंबर केले होते. फरेब आणि जहर सिनेमातही तिनं काम केलं होतं. बिग बॉसच्या सीझन 15 आधीही तिनं बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता. बिग बॉस 3 मध्ये तिनं भाग घेतला होता. मात्र शिल्पा शेट्टीच्या लग्नामुळे ती बिग बॉसच्या घराबाहेर पडली होती. बिग बॉस 15च्या सीझनआधी 2021मध्येही बिग बॉसच्या ओटीटी सीझन 9 मध्ये शमितानं भाग घेतला होता. इतकंच काय तर कलर्सवरील डान्स रियालिटी शो झलक दिखला जा यातही ती दिसून आली आहे.

जिंकणार कोण? याची उत्सुकता!

दरम्यान शमिताच्या एक्झिटआधी निशांतही घरातून काढता पाय घेतला होती. 10 लाख रुपये घेत निशांत भट्टही घराबाहेर पडला होता. आत शमिता बाहेर पडल्यानंतर बिग बॉसचा विजेता नेमका कोण होतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, आणि प्रतिक सेहजपाल यांच्यात चुरस पाहायला मिळतेय.

संबंधित बातम्या

Bigg Boss 15 Grand Finale : बिग बॉस 15च्या ग्रॅड फिनालेला सेलिब्रिटींची हजेरी, आवडत्या स्पर्धकाला सपोर्ट करण्यासाठी कलाकारांची उपस्थिती

10 लाख घेत निघाला घरी! निशांत भट्टचा बिग बॉसच्या घरातून निघण्याचा निर्णय चुकला? काय म्हणाला भाईजान

सलमान हिशोबात नायतर पेनाने कोथळा काढू, बिचुकले पुन्हा भडकले, तर मुख्यमंत्र्यांना काय सल्ला दिला?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI