Bigg Boss 20 : स्टार खूप, रॉकस्टार फक्त 1.. सलमान खानने कोणाचं केलं भरभरून कौतुक ?
Bigg Boss 20 Salman Khan : 'बिग बॉस 20'च्या 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खानने एका स्पर्धकाचं खूप कौतुक करत त्याला रॉकस्टार म्हटलं. एवढंच नव्हे तर त्याची एक स्टेप घरातल्या इतर लोकांनाही फॉलो करायला लावली.

Salman Khan Bigg Boss 20 : ‘बिग बॉस’ सुरू होताच लाखो चाहते ‘वीकेंड का वार’ एपिसोडची खूप उत्सुकतेने वाट पहात असतात. कारण खुद्द दबंग स्टार सलमान खान ( Salman Khan) या एपिसोडला हजेरी लावतो आणि अनेक स्पर्धकांची शाळा घेतो.एवढंत नव्हे तर जे स्पर्धक चांगल्या पद्धतीने त्यांचा गेम खेळतात, सलमान त्यांचं खुल्या दिलाने कौतुकही करतो. 12 सप्टेंबर म्हणजेच आज रात्री ‘बिग बॉस 20’ चा पहिला ‘वीकेंड का वार’ टेलिकास्ट होणार आहे. त्याच भागाचा एक प्रोमो समोर आला असून, त्यामध्ये सलमान खानने एका स्पर्धकाचं कौतुक करत त्याला चक्क रॉकस्टार म्हटलंय.
तो स्पर्धक दुसरा-तिसरा कोणी नव्हे तर गायक काझी तौकीर हा आहे. तो जेव्हापासून या शोमध्ये आलाय तेव्हापासून तो बऱ्याचदा “आय ॲम अ रॉकस्टार” असं म्हणताना दिसलाय. त्यानंतर तो आऊं असा आवाजही काढलो. स्वत: स्वत:लाच रॉकस्टार म्हणत तो एक छोटीशी डान्स स्टेपही करतो, सध्या जो प्रोमो समोर आलाय, त्यात सलमान खानही त्याला सांगतो की मला ही स्टेप शिकव ना..
काय म्हणाला दबंग स्टार ?
‘या घरात कितीही स्टार्स असले तरी रॉकस्टार फक्त एकच आहे.. काझी तौकीर’ असं सलमान म्हणाला. ‘संपूर्ण आठवडा तू आऊं करत होतास, मला ही हे “आय ॲम अ रॉकस्टार” करायला शिकव ना.. ‘ असं सलमानने त्याला सांगतलं. त्यानंतर काझी त्याच्या सीटवरून उठला आणि ती लाईन म्हणत त्याने त्याची स्टेप पुन्हा करून दाखवली. त्यानंतर सलमान घरातल्या सगळ्या स्पर्धकांनाही काझीला फॉलो करत ती स्टेप करायला सांगतो.
‘बिग बॉस 20’ प्रोमो व्हिडीओ
हे माझ्यासाठी खूप कठीण आहे, असं सलमान पुढे म्हणाला. जिओ हॉटस्टारने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “ काझी तौकीरच्या रॉकस्टार अंदाजाने भाई देखील दिवाना झाला” अशी कॅप्शन त्यासोबत लिहीली.
कुठे पाहता येईल बिग बॉस 20’ ?
6 सप्टेंबरपासून ‘बिग बॉस 20’ ला सुरूवात झाली आहे. दररोज रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टारवर तर 10.30 ला कलर्सवर या शोचा लेटेस्ट एपिसोड रिलीज होतो. काझी तौकीर याच्याव्यतिरिक्त मैरी कॉम, आसिफ खान, आम्रपाली दुबे, अरिश्फा खान आणि माही विजसह 16 स्पर्धक यंदा शोमध्ये सहभागी झालेत.