गर्लफ्रेंडच्या बाबतीत संजय दत्तला टक्कर देणारा अभिनेता, केला 300 गर्लफ्रेंड असल्याचा दावा

गर्लफ्रेंडच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला टक्कर देतो हा 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता. होत्या 300 गर्लफ्रेंड. कोण आहे हा अभिनेता?

गर्लफ्रेंडच्या बाबतीत संजय दत्तला टक्कर देणारा अभिनेता, केला 300 गर्लफ्रेंड असल्याचा दावा
| Updated on: Jun 08, 2026 | 6:14 PM

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी चर्चेत आल्या होत्या. त्यामध्ये त्याच्या आयुष्यात 300 हून अधिक गर्लफ्रेंड्स असल्याचा दावा विशेष गाजला होता. मात्र, आता 90 च्या दशकातील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्यानेही असाच खुलासा केल्याने चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

हा अभिनेता म्हणजे ‘आशिकी’ फेम राहुल रॉय. नुकताच राहुल रॉय लोकप्रिय कॉमेडी रिअॅलिटी शो ‘लाफ्टर शेफ्स सीझन 3’ मध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने आपल्या करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही काही मनोरंजक खुलासे केले.

राहुल रॉयला 300 गर्लफ्रेंड्स होत्या?

या कार्यक्रमादरम्यान अभिनेता आणि विनोदी कलाकार कृष्णा अभिषेक यांनी राहुल रॉयला तुमच्या आयुष्यात 300 गर्लफ्रेंड्स होत्या असे आम्ही ऐकले आहे. हे खरे आहे का? असा प्रश्न विचारला. यावर राहुल रॉयने हसत आणि लाजत या गोष्टीला दुजोरा दिला. त्याच्या या उत्तराने कार्यक्रमातील सर्व कलाकार आश्चर्यचकित झाले.

यानंतर विनोदी शैलीत भारती सिंहने उपस्थित कलाकार समर्थ जुरेल आणि अभिषेक कुमार यांची फिरकी घेत म्हणाली, तुम्हाला एकही गर्लफ्रेंड मिळत नाही आणि यांच्याकडे 300 गर्लफ्रेंड्स होत्या. या वक्तव्यामुळे सेटवर एकच हशा पिकला.

राहुल रॉयने 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील गाणी आणि प्रेमकथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. ‘आशिकी’ प्रदर्शित होताच राहुल रॉय तरुणाईचे आयकॉन बनले. आजही या चित्रपटातील अनेक गाणी लोकप्रिय आहेत.

राहुल रॉय 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता

‘आशिकी’च्या अभूतपूर्व यशानंतर राहुल रॉयने ‘सपने साजन के’, ‘जुनून’, ‘गुमराह’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्याच्या पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती पुढील चित्रपटांना करता आली नाही. तरीही ‘आशिकी’मधील त्याच्या भूमिकेमुळे राहुल रॉय आजही 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो.

दरम्यान, ‘लाफ्टर शेफ्स सीझन 3’मधील राहुल रॉयच्या या खुलाशामुळे सोशल मीडियावरही चर्चांना उधाण आले असून चाहत्यांमध्ये त्याच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे.

Follow Us