आपल्या मर्यादेत राहायचे.. पत्नी सुनितावर भडकला गोविंदा, थेट लाज काढताच..

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनिता आहुजा हिने गोविंदाबद्दल धक्कादायक विधान करत त्याला लाज वाटली पाहिजे, असे मोठे विधान केले, ज्याने एकच खळबळ उडाली. आता यावर गोविंदाने भाष्य केले.

आपल्या मर्यादेत राहायचे.. पत्नी सुनितावर भडकला गोविंदा, थेट लाज काढताच..
Govinda and Sunita Ahuja
| Updated on: Aug 15, 2026 | 6:41 PM

सुनिता आहुजा यांनी पती आणि अभिनेता गोविंदा याच्याबद्दल धक्कादायक विधान केले. थेट शुगर डॅडी म्हणत मुलीच्या वयाच्या मुलीला घेऊन फिरत असल्याचे म्हटले. हेच नाही तर त्या अभिनेत्रीच्या स्टेट्सबद्दलही भाष्य केले. गोविंदाच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे यावरून स्पष्ट दिसतंय. गेल्या काही दिवसांपासून गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा या जोरदार रंगताना दिसत आहेत. त्यावर सुनिता या जाहीरपणे बोलत आहेत. सुनिता यांनी केलेल्या टीकेवर गोविंदा आता चांगलाच संतापला आहे. सुनिता आहुजाच्या शब्दांवर थेट टीका गोविंदाने केली. गोविंदाचा पारा चांगलाच चढला. गोविंदाने सुनिता यांना मर्यादा पाळण्याचा इशारा दिला. सुनिता यांनी आपला पती गोविंदा याला सह-अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत पाहिले, मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत फिरताना गोविंदाला लाज वाटली पाहिजे, असे म्हटले.

आता सुनिता आहुजाकडून झालेल्या टिकेवर गोविंदाने एका व्हिडीओच्या माध्यमातून उत्तर दिले. कोमल राणी हिच्या कपड्यांवर सुनिता यांनी भाष्य केले. सुनिताला उत्तर देताना गोविंदाने म्हटले की, सुनिता जी, तुम्ही आता आई बहिणींच्या नावाने शिवीगाळ सुरू केला. ती भाषा वापरली जात आहे. तुम्ही देवाला प्रार्थना केली पाहिजे की, जर लोक तुमच्यापासून प्रेरित होत असतील तर

त्यांनी तुमच्यासारखेच वर्तन करू नये. तरुण पिढी तुमच्याकडे पाहते. जर तुमच्यामुळे लोकांनी अशी भाषा वापरण्यास सुरुवात केली, तर आपल्या सर्वांनाच खूप लाज वाटेल. हे योग्य नाही.. कृपया असे करू नका. तुम्ही आई आणि बहीण या शब्दांची पवित्रता कमी केली आहे. तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही.. असे गोविंदा स्पष्ट शब्दात बोलताना दिसत आहे.

आता गोविंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. गोविंदाला पत्नी सुनिता हिचे हे वागणे अजिबात आवडले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्यापासून सुनिता आहुजा बऱ्याच गोष्टी थेटपणे मिडियासमोर बोलत आहेत. आता त्यांनी गोविंदाला लाज वाटली पाहिजे, असे थेट म्हटल्याने एकच खळबळ उडाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us