गडगंज श्रीमंत दिग्दर्शकासोबत दुसरं लग्न, उद्ध्वस्त झालं अभिनेत्रीचं आयुष्य… अखेर 69 व्या वर्षी मनातील खंत बोलूनच दाखवली
झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या खासगी आयुष्यात अनेक चढ - उतार आले आहेत. यामध्ये अभिनेत्रींची संख्या काही प्रमाणात मोठी आहे. आता देखील लग्न झाल्यानंतर करियरमध्ये आलेल्या अडचणींबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. लग्नानंतर सर्वकाही संपलं, असं तिला वाटलेलं. अखेर अभिनेत्रीने वयाच्या 69 व्या वर्षी मनातील खंत बोलून दाखवली आहे.

ग्लॅमरच्या विश्वात सेलिब्रिटींची लाईफस्टाईल सर्वांना आकर्षित करते. पण पडद्यामागे कोणासोबत काय घडत आहे, याबद्दल कोणाला माहिती नसतं. अभिनेत्री त्यांच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान भक्कम करतात. पण खासगी आयुष्यात त्यांना चढ – उतारांचा सामना करावा लागतो. आता देखील असाच एक किस्सा समोर येत आहे. अभिनेत्रीने श्रीमंत दिग्दर्शकासोबत लग्न तर केलं, पण लग्नानंतर काही दिवसांनी तिला काम मिळणं देखील बंद झालं, यावर खुद्द अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. ‘लग्न झालंय तुला आता पैशांची काय गरज…’, असं सांगत अभिनेत्रीला दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी काम देणं देखील बंद केलं होतं… पण आज अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
सांगायचं झालं तर, सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे , ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सोनी राजदान आहे. सोनी हिने दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबत लग्न केलं. लग्नापूर्वी त्या बॉलिवूडमध्ये सक्रिय होत्या. लग्नानंतर देखील सोनी यांना सिनेमासाठी ऑफर येत होत्या, पण अचानक ऑफर येणं बंद झाल्या. अखेर, त्यांनी बॉलिवूडपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनी राजदान म्हणाल्या, ‘जेव्हा माझं लग्न झालं, त्याआधीपासून मी काम करत होते. त्यामुळे ते काम चालत राहिलं.पण त्यानंतर काहीही झालं नाही. बिलकूल काहीच नाही… सगळं काही अचानक संपलं…असं वाटू लागलं होतं. लोकांनी महेश यांना असं देखील तं की, ‘तुझ्या बायकोला आता कामाची काय गरज आहे? आता तर लग्न देखील झालं आहे?’, यावर सोनी राजदान म्हणाल्या, ‘मझ्यासाठी हे विचार पूर्णपणे वेगळे होते. मी असं वातावारण आणि अशा विचारांसोबत मोठी झालेली नाही. तेव्हा असंख्य लोक याच विचारांचे होते.’
सोनी राजदान यांनी पुढे महिलांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. ‘अखेर एका महिलेचं सुंदर आणि आकर्षक दिसणं इतकं महत्त्वाचं काय आहे? मला असं वाटतं की. तुम्ही सिनेमांमध्ये काम करता. लोक तुम्हाला पडद्यावर अडीच तास पाहणार आहेत, त्यामुळे तुमच्यात असं काहीतरी असायला हवं ज्यामुळे प्रेक्षकांना तुम्हाला पाहावेसं वाटेल.’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनी राजदान यांची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, सोनी राजदान या महेश भट्ट यांच्या दुसऱ्या पत्नी आहे.