विराट कोहली याला वामिका आणि अकायने दिले मोठे गिफ्ट, अनुष्का शर्मा म्हणाली, आम्ही..

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने काही दिवसांपासून लंडनमध्ये मुलाला जन्म दिलाय. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या मुलाचे नाव अकाय ठेवलंय. आता मुलाच्या जन्मानंतर अनुष्का शर्मा ही भारतात परतली आहे. अनुष्का शर्माने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.

विराट कोहली याला वामिका आणि अकायने दिले मोठे गिफ्ट, अनुष्का शर्मा म्हणाली, आम्ही..
Anushka Sharma and Virat Kohli
| Updated on: Jun 16, 2024 | 6:08 PM

आज संपूर्ण जगभरात फादर्स डे साजरा केला जातोय. अनेकांनी आपल्या वडिलांसोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फादर्स डेची एक धूम नक्कीच बघायला मिळतंय. अनुष्का शर्मा ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. अनुष्का शर्मा हिचे चाहते तिच्या पुनरागमनाची वाट पाहताना दिसत आहेत. अनुष्का शर्मा सध्या सोशल मीडियावर सक्रिय दिसतंय. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अनुष्का शर्मा दिसते. अनुष्का शर्मा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात मुख्य भूमिका केल्या आहेत.

अनुष्का शर्मा हिने नुकताच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. अनुष्का शर्मा हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. अनुष्का शर्मा हिने ही पोस्ट खास फादर्स डेनिमित्त शेअर केलीये. ही पोस्ट शेअर करत अनुष्का शर्मा हिने विराट कोहली याला अत्यंत मोठे गिफ्ट दिल्याचे स्पष्ट दिसतंय. आता अनुष्का शर्माच्या पोस्टवर चाहतेही मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

Loading...

अनुष्का शर्मा हिने इंस्टाग्रामवर एक सुंदर अशी पेंटिंग शेअर केलीये. या पेंटिंगमध्ये वामिका आणि अकायच्या पायांची ठसे दिसत आहेत. हे ठसे पिवळ्या रंगाच्या मदतीने घेण्यात आले. सोबतच ‘हॅपी फादर्स डे’ आणि त्यानंतर लाल हार्ट इमोजी काढलेले पेंटिंगमध्ये दिसत आहे. यासोबतच तिने हे पेंटिंग शेअर करत खास कॅप्शनही शेअर केले आहे.

अनुष्का शर्माने लिहिले की, एक माणूस इतक्या गोष्टींमध्ये इतका चांगला कसा असू शकतो… आम्ही तुझ्यावर प्रेम करतो @virat.kohli…आता या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात सतत कमेंट करताना दिसत आहेत. ही पेंटिंग शेअर करत अनुष्का शर्मा हिने विराट कोहली याला एकप्रकारे मोठे गिफ्टच दिले आहे.

अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. अनुष्का शर्मा हिने मुलीसोबतचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये वामिका हिच्यासोबत मस्ती करताना अनुष्का शर्मा दिसली. हेच नाही तर लेकीच्या आवडतीचे आईस्क्रीम खाताना देखील अनुष्का शर्मा ही दिसली. मुलीसोबत चांगला वेळ घालवताना अनुष्का शर्मा दिसली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us