
झगमगत्या विश्वात अभिनेत्री कायम रॉयल आयुष्य जगताना दिसतात. पण खासगी आयुष्यात मात्र अनेक संकटांचा सामना करत असतात. आता देखील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत असंच काही झालं आहे. अभिनेत्री सेलिना जेटली हिच्यासोबत देखील असंच काही झालं आहे. लग्नाच्या 15 व्या वाढदिवशी नवऱ्याने सेलिना हिला भेट म्हणून घटस्फोटाची नोटीस दिली. शिवाय अभिनेत्रीला तिच्या तीन मुलांपासून देखील लांब ठेवलं. आता अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेली घटना सोशल मीडियाच्या माध्यामातून सांगितली आहे. सेलिना जेटलीने 13 जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर एक मोठा पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने स्पष्ट केलं की, तिने तिच्या प्रतिष्ठेसाठी, तिच्या भावाच्या आणि तिच्या मुलांसाठी ऑस्ट्रिया सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच दिवशी ती त्यांच्यापासून वेगळी झाली.
अभिनेत्रीने खुलासा केला की, तिने 11 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 1 वाजता तिच्या शेजाऱ्यांच्या मदतीने देश सोडला. शोषण आणि गैरवापरापासून स्वतःला वाचवण्यासाठी अभिनेत्री इच्छा नसताना भारतात यावं लागलं… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सेलिना हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
सेलिना जेटली हिच्यावर पतीने केलेले आरोप…
अभिनेत्रीने 2004 भारतात एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. पण तेथे जाण्यासाठी अभिनेत्रीला कोर्टाने मदत घ्यावी लागली. कारण त्यामध्ये नवरा हक्क मागत होता. त्यासाठी अभिनेत्रीला लोन देखील घ्यावं लागलं होतं. ऑस्ट्रियन कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशानंतरही, तिला तिच्या तीन मुलांशी बोलण्याची परवानगी दिली नाही, ज्यामुळे ती खूप अस्वस्थ देखील झाली होती.
सेलिना जेटली म्हणाली, ‘माझ्या मुलांना मला भेटता येत नव्हतं… त्यांना माझ्या विरोधात घाबरवलं…सप्टेंबरच्या सुरुवातीला, माझ्या नवऱ्याने मला घटस्फोटाची नोटीस दिली.” अभिनेत्रीने पुढे खुलासा केला की, नवऱ्याने लग्नाच्या वाढदिवशी भेटवस्तू खरेदी करणार असल्याचं सांगून जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये गाडीत घेऊन गेला होता. ‘
सेलिना हिने सांगितल्यानुसार, हे नातं शांततेने आणि सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडायचं होतं आणि तिने अनेक वेळा विनंती केली होती कारण तिला तिच्या मुलांच्या भविष्याशी तडजोड करायची नव्हती. तरीही, तिला अजूनही विचित्र अटींना तोंड द्यावे लागलं. मुलांना माझ्यापासून दूर केलं. त्या एका क्षणात माझ्याकडून माझं संपूर्ण जग हिसकावून घेतलं… असं देखील अभिनेत्री म्हणाली.