प्रसिद्ध अभिनेत्री आणि तिच्या बहिणीत फक्त 6 महिन्याचा गॅप? असं कसं? नेटकरी लागले डोकं आपटायला

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि तिच्या बहिणीमध्ये आहे फक्त 6 महिन्यांचा गॅप? जन्म तारीख पाहून चाहते थक्क, म्हणाले हे कसं शक्य?

प्रसिद्ध अभिनेत्री आणि तिच्या बहिणीत फक्त 6 महिन्याचा गॅप? असं कसं? नेटकरी लागले डोकं आपटायला
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 03, 2026 | 1:38 PM

Disha and Khushboo Patani : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी ही तिच्या ग्लॅमरस लाइफस्टाइल, फिटनेस आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र, अलीकडे दिशा नाही तर तिची बहीण खुशबू पाटनी सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली खुशबू विविध मुद्द्यांवर परखड मत मांडताना दिसते तसेच ती नियमितपणे तिचे व्हिडीओ चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

दरम्यान, अशातच आता दिशा आणि खुशबू यांच्या वयाबाबत सोशल मीडियावर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. यामागचं कारण म्हणजे गुगलवर दाखवण्यात आलेली दोघींची जन्मतारीख. गुगल प्रोफाइलनुसार, दिशा पाटनीचा जन्म 13 जून 1992 रोजी झाला आहे. तर तिची बहीण खुशबू पाटनीचा जन्म 23 नोव्हेंबर 1991 रोजी झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या माहितीनुसार दोघींमध्ये केवळ 6 ते 7 महिन्यांचाच वयाचा फरक आहे. काही ठिकाणी हा फरक सुमारे 203 दिवसांचा असल्याचंही सांगितलं जात आहे.

दिशाने दिलेत अनेक हिट चित्रपट

ही माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, असं कसं शक्य आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर काहींचं म्हणणं आहे की, गुगलवर दाखवण्यात आलेल्या जन्मतारखा चुकीच्या असू शकतात आणि त्या अधिकृत नसण्याचीही शक्यता आहे.

दिशा पाटनी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘बागी 2’, ‘बागी 3’, ‘भारत’, ‘राधे’, ‘एक विलन रिटर्न्स’, ‘योद्धा’ आणि अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘कल्कि 2898 एडी’ अशा चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लवकरच ती ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात झळकणार आहे.

दिशा तलविंदरला करतेय डेट?

तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर दिशा पाटनीचे नाव काही काळ अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडलं गेलं होतं. दोघांनी एकत्र चित्रपटांमध्ये काम केलं असून, त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत होती. मात्र नंतर दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या. सध्या दिशा पंजाबी गायक तलविंदरला डेट करत असल्याच्या अफवाही सोशल मीडियावर पसरल्या आहेत.

दिशाची बहीण खुशबू पाटनी ही माजी भारतीय लष्कर अधिकारी असून, सध्या फिटनेस कोच, लेखिका आणि वेलनेस काउंसलर म्हणून कार्यरत आहे. सोशल मीडियावर ती फिटनेस, मानसिक आरोग्य आणि सामाजिक विषयांवर खुलेपणाने मत मांडताना दिसते.