‘तुम्ही डान्समध्ये झिरो आहात’, कतरिनाला या कोरिओग्राफरने दिलेला डान्स सोडण्याचा सल्ला, नंतर तिने…

तुम्ही डान्समध्ये झिरो आहात, कतरिना कैफला कोरिओग्राफरने दिलेला डान्स सोडण्याचा सल्ला, पण शीला की जवानीने बदललं नशीब. कोण आहे तो कोरिओग्राफर?

‘तुम्ही डान्समध्ये झिरो आहात’, कतरिनाला या कोरिओग्राफरने दिलेला डान्स सोडण्याचा सल्ला, नंतर तिने...
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 12, 2026 | 6:57 PM

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या अभिनयासोबतच जबरदस्त डान्स स्टेपसाठीही प्रसिद्ध आहे. ‘चिकनी चमेली’, ‘कमली’, ‘काला चश्मा’ आणि ‘स्वॅग से स्वागत’ यांसारख्या गाण्यांमधील तिच्या डान्सने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. मात्र, कतरिनाचा हा डान्सिंग क्वीन बनण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिच्या डान्सची खिल्ली उडवली जात होती, इतकंच नाही तर तिला डान्स सोडण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस आणि फराह खान यांनी नुकत्याच झालेल्या पॉडकास्टमधील चर्चेत कतरिनाच्या संघर्षाबद्दल अनेक खुलासे केले. बॉस्को यांनी सांगितलं की, सुरुवातीच्या काळात सेटवर कतरिनाला तिच्या डान्समुळे अपमानित केलं जायचं. एका कोरिओग्राफरने तर तिला ‘तुम्ही डान्समध्ये झिरो आहात, त्यामुळे डान्स सोडून द्यायला हवा’ असंही सांगितलं होतं.

‘शीला की जवानी’ ठरलं टर्निंग पॉइंट

फराह खान यांनी सांगितलं की, ‘तीस मार खान’मधील ‘शीला की जवानी’ हे गाणं त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात कमी बजेटमध्ये शूट झालेल्या गाण्यांपैकी एक होतं. या गाण्याचं संपूर्ण शूटिंग अवघ्या 10 बॅकग्राउंड डान्सर्स आणि कतरिना कैफसोबत करण्यात आलं होतं.

बॉस्को मार्टिस यांच्या मते, ‘शीला की जवानी’ हे कतरिनाच्या करिअरमधील सर्वात मोठं गेमचेंजर ठरलं. फराह खान यांनीही याला दुजोरा देत सांगितलं की, या गाण्यापूर्वी कतरिनाची ओळख एक उत्तम डान्सर म्हणून निर्माण झालेली नव्हती.

‘शीला की जवानी’नंतर कतरिनाने गाठलं नवं शिखर

फराह खान यांनी मजेशीर अंदाजात सांगितलं की, सुरुवातीला कतरिनाला डान्समध्ये कदाचित 4-5 गुण मिळाले असतील; पण ‘शीला की जवानी’नंतर ती थेट 9-10 गुणांच्या पातळीवर पोहोचली. त्यानंतर ‘अग्निपथ’मधील ‘चिकनी चमेली’ आणि ‘धूम 3’मधील ‘कमली’सारखी गाणी तिच्या वाट्याला आली.

‘शीला की जवानी’पासून सुरू झालेला कतरिनाचा डान्सिंगचा प्रवास पुढे ‘काला चश्मा’, ‘स्वॅग से स्वागत’, ‘अफगान जलेबी’ आणि ‘नचदे ने सारे’पर्यंत पोहोचला. आज कतरिना कैफला बॉलिवूडमधील लोकप्रिय डान्सिंग स्टार्सपैकी एक मानलं जातं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us