AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहित पुरुषावर प्रेम करु नका, नीना गुप्तांचा तरुणींना सल्ला

"कधी लग्न झालेल्या पुरुषासोबत प्रेम करु नका. मी यामुळे खूप त्रास सहन केला आहे", असा सल्ला प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta suggestion to girls) यांनी आपल्या चाहत्यांना दिला आहे.

विवाहित पुरुषावर प्रेम करु नका, नीना गुप्तांचा तरुणींना सल्ला
| Edited By: | Updated on: Mar 04, 2020 | 12:51 PM
Share

देहरादून (उत्तराखंड) : “कधी लग्न झालेल्या पुरुषासोबत प्रेम करु नका. मी यामुळे खूप त्रास सहन केला आहे”, असा सल्ला प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta suggestion to girls) यांनी आपल्या चाहत्यांना दिला आहे. उत्तराखंडच्या मुक्तेश्वरमध्ये नीना गुप्ता यांनी एक व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर (Neena Gupta suggestion to girls) केला आहे.

या व्हिडीओच्या सुरुवातीला नीना गुप्ता यांनी विवाहबाह्य संबंध कसे सुरु होतात त्याबद्दल सांगितले आहे.

नीना गुप्ता म्हणाल्या, “एखादा पुरुष तुम्हाला सांगणार की, त्याला त्याची पत्नी आवडत नाही. बऱ्याच वर्षांपासून आम्ही एकत्र राहत नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. जेव्हा तुम्ही त्याला वेगळे व्हायला सांगता तेव्हा मला मुलं आहेत असे  तो सांगणार.”

“लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडल्यानंतर तुम्ही लपून लपून भेटता आणि सुट्टीमध्ये फिरायला जाता. अनेक रात्र तुम्ही एकत्र त्याच्यासोबत घालवता. त्यानंतर तुम्ही त्याच्याशी लग्न करण्यास इच्छुक असता. तेव्हा महिला पुरुषाला आपल्या पत्नीपासून घटस्फोट घ्यायला सांगते. पण ते्व्हा पुरुष म्हणतो की, घटस्फोट करणे सोपे नाही. कारण प्रॉपर्टी, बँक अकाऊंट वगैरे इतर कारणं देतात”, असं नीना यांनी सांगितले.

View this post on Instagram

#sachkahoontoe

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

“अशा प्रकरणानंतर महिला नाराज होऊन त्याला सोडण्याचा विचार करतात. त्यामुळे मुलींनो अशा प्रकरणांमध्ये पडू नका. मी हे सर्व केले आहे. मला खूप त्रास सहन करावा लागला. यासाठी तुम्ही असे करु नका”, असा सल्ला नीना यांनी दिला.

दरम्यान, नीना गुप्ताचे वेस्टइंडीजचा क्रिकेटर विलियम रिचर्डससोबत प्रेमसंबंध होते. या नात्यातून त्यांना एक मुलगीही झाली आहे. तिचे नाव मसाबा गुप्ता आहे. मसाबा एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. नुकतेच नीनाची मुलगी मसाबाचा आपल्या पतीसोबत घटस्फोट झाला. त्यामुळे कदाचीत नीनाने हा व्हिडीओ शेअर केला असावा, असं म्हटलं जात आहे.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.