नोरा फतेहीच्या कथित बॉयफ्रेंडवर बलात्काराचे गंभीर आरोप! 2 मुलांचा बाप… बायकोला सोडल्यानंतर…

Nora Fatehi Boyfriend: नोरा फतेहीच्या कथित बॉयफ्रेंड 2 मुलांचा बाप..., बोयकोला सोडल्यानंतर..., त्याच्यावर बालात्काराचे आरोप, म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोहा फतेही हिच्या कथित बॉयफ्रेंडच्या खासगी आयुष्याची चर्चा...

नोरा फतेहीच्या कथित बॉयफ्रेंडवर बलात्काराचे गंभीर आरोप! 2 मुलांचा बाप... बायकोला सोडल्यानंतर...
अभिनेत्री नोरा फतेही
| Updated on: Feb 25, 2026 | 9:58 AM

Nora Fatehi Boyfriend: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिचं खासगी आयुष्य कायम सिक्रेट ठेवते. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीचं नाव लोकप्रिय फुटबॉलर अशरफ हकीमी (Achraf Hakimi ) याच्यासोबत जोडलं जात आहे. अशरफ आणि नोरा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना तेव्हा जोर धरला जेव्हा अभिनेत्री अफ्रिकी कप ऑफ नेशन्सचा सामना पाहण्यासाठी पोहोचली होती आणि मोरक्को नॅशनल फुटबॉल टीमला चीयर करत होती. तर जाणून अशरफ नक्की कोण आहे? सर्वात धक्कादायक म्हणजे अशरफ याच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत. त्याचं खासगी आयुष्य देखील वादग्रस्त राहिलं आहे.

अशरफ हकीमीचे आई – वडिला मोरोक्कन अरब वंशाचे आहेत, म्हणूनच हकीमीनेही मोरोक्कन संघाची निवड केली. तो सध्या 27 वर्षांचा आहे आणि संघाचा कर्णधार आहे. अशरफ यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, 2020 मध्ये त्याने स्पॅनिश अभिनेत्री हिबा अबूक हिच्यासोबत लग्न केलं. दोघांना दोन मुलं देखील आहे. पण अशरफ आणि हिबा यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. 2023 मध्ये अशरफ आणि हिबा यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली…

धक्कादायक सत्य म्हणजे, अशरफ याच्यवर बलात्काराचे देखील आरोप आहे. 2023 मध्ये पॅरिस येथील हे प्रकरण आहे… सध्या याप्रकरणी चौकशी सुरु आहे.. पण, अशरफ हकीमी याने केलेल्या दाव्यानुसार, आरोप ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या उद्देशाने त्याच्याविरुद्ध करण्यात आले आहेत आणि त्याने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अद्यापही याप्रकरणी चौकशी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

नोरा फतेही आणि अशरफ हकीमी

सांगायच झालं तर, यापूर्वी देखील अनेकदा नोरा फतेही हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं आहे. पण आता अशरफ हकीमी याच्यासोबत अभिनेत्रीच्या नावाचे चर्चा सुरु असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या फक्त आणि फक्त नोरा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे.

गेल्या कही दिवसांपासून नोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण अभिनेत्री कधीच स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल बोलत नाही. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर नोरा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.