Honey Singh Divorce : घटस्फोटासाठी हनी सिंग याला मोजावे लागले कोट्यवधी रुपये

Honey Singh Divorce: हनी सिंग याचा घटस्फोट, 11 वर्षांचं नातं एका सहीने संपलं, ज्यासाठी गायकाला मोजावे लागले कोट्यवधी रुपये... 20 वर्ष रिलेशनशिप, 11 वर्षांचं लग्न... हनी सिंग याचे पत्नीसोबतचे मार्ग मोकळे... गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होती घटस्फोटाची चर्चा...

Honey Singh Divorce : घटस्फोटासाठी हनी सिंग याला मोजावे लागले कोट्यवधी रुपये
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 1:07 PM

मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी घटस्फोट घेत नात्याला पूर्णविराम दिला आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंग (Honey Singh) याचा देखील घटस्फोट झाला आहे. हनी सिंग आणि पहिली पत्नी शालिनी तलवार यांचा घटस्फोट झाला आहे. दिल्ली न्यायालयाने हनी सिंग आणि शालिनी यांच्या घटस्फोटोला मंजूरी दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हनी सिंग आणि शालिनी यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून हनी सिंग आणि शालिनी यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक न्यायालयात परमजीत सिंह यांनी हनी सिंग आणि शालिनी यांच्या घटस्फोटाने आदेश दिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हनी सिंग आणि शालिनी घटस्फोटासाठी कोर्टाच्या फेऱ्या मारत होते. अखेर दोघ्यांच्या नात्याचा अंत झाला आहे. शालिनी हिने हनी सिंग याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते.

‘हनी सिंग आणि त्याच्या कुटुंबियांनी माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला…’ असे गंभीर आरोप शालिनी हिने सासरच्या मंडळींवर केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हनी सिंगने शालिनीला एक कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्टही दिला होता.

हे सुद्धा वाचा

हनी सिंग आणि शालिनी यांचं नातं

रिपोर्टनुसार, लग्नाआधी हनी सिंग आणि शालिनी यांनी तब्बल 20 वर्ष एकमेकांना डेट केलं. त्यानंतर दोघांनी 2011 मध्ये पारंपरिक पद्धतील लग्न केलं. दोघांच्या लग्नात फक्त कुटुंबिय होते. दोघांनी देखील त्यांचं नातं फार गुपित ठेवलं होतं. पण कालांतराने दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. अखेर एक शोमध्ये हनी सिंग याने विवाहित असल्याचा खुलासा केला होता.

20 वर्ष रिलेशनशिपनंतर लग्न करत हनी सिंग आणि शालिनी यांनी त्यांच्या नात्याला पती – पत्नीचं नाव दिलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या जवळपास 11 वर्षांनंतर हनी सिंग आणि शालिनी यांनी एक सही करत पती – पत्नीचं नातं संपवलं आहे. आता दोघांचे मार्ग कायमचे वेगळे झाले आहेत.

सांगायचं झालं तर, बॉलिवूड सिनेविश्वात हनी सिंग याचं स्थान फार मोठं आहे. अनेक सिनेमांसाठी हनी सिंग याने काम केलं आहे. हिंदी सिनेविश्वाला हनी सिंग याने अनेक हीट गाणी दिली आहेत. सोशल मीडियावर देखील हनी सिंग याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. आता गायक त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.