सख्या बहिणीची सवत, 3 दिवस सडत होता मृतदेह, 700 सिनेमे करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीची शेवटच्या क्षणी झालेली अशी अवस्था…

सख्या बहिणीच्या नवऱ्यावरच जडला जीव... शेवटच्या क्षणी सर्वांनी सोडली साथ... 3 दिवस घरात सडत होता अभिनेत्रीचा मृतदेह... 700 सिनेमे करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीचा हृदयद्रावक शेवट

सख्या बहिणीची सवत, 3 दिवस सडत होता मृतदेह, 700 सिनेमे करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीची शेवटच्या क्षणी झालेली अशी अवस्था...
| Updated on: Feb 25, 2026 | 12:31 PM

बॉलिवूडमध्ये असंख्य अभिनेत्री आल्या ज्यांनी चाहत्यांच्या मनावर आणि मोठ्या पडद्यावर राज्य केलं. पण त्यांचं खासगी आयुष्य देखील कोणत्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नव्हतं… चाहत्यांनी अभिनेत्रींना डोक्यावर घेतलं, पण शेवटच्या क्षणी मात्र त्यांच्या जवळ कोणीच नव्हतं… बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्रीसोबत असं काही झालं, ज्यामुळे सर्वकाही उद्ध्वस्त झाली… सिनेविश्वातील अशी अभिनेत्री जिच्यासाठी नशीब हा शब्द देखील शाप ठरला… अभिनेत्रीने रुपेरी पडद्यावर सर्व नाती योग्यरित्या सांभाळली… पण खऱ्या आयुष्यात मात्र अभिनेत्री फेल ठरली… सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री अंबिका म्हणजेच ललिता पवार आहे.

1928 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राजा रहिशचंजद्र ‘ सिनेमात अभिनेत्रीने झगमगत्या विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ‘हिम्मत-ए-मर्दां’ यांसारख्या अनेक सिनेमात अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका बजावली… 40 च्या दशकात अभिनेत्री अनेक सिनेमात दिसली. प्रोफेशनल आयुष्यात ललिता हिने अनेक चढ – उतार पाहिले. तर अभिनेत्रीचं खासगी आयुष्य प्रचंड भयानक होतं…

ललिता हिने निर्माते गणपतराव पवार यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांच्या नात्यात वादळ तेव्हा आलं जेव्हा अभिनेत्रीला कळलं की आपल्या नवऱ्याचं अफेअर सख्या बहिणीसोबत सुर आहे. यामुळे ललिता यांना फार मोठा धक्का बसला… त्यानंतर अभिनेत्रीने गणपतराव यांना घटस्फोट देत निर्माते राजप्रकाश गुप्ता यांच्यासोबत लग्न केलं आणि एका मुलाचं जगात स्वागत केलं..

घरात सडत राहिला मृतदेह…

700 पेक्षा जास्त सिनेमात दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा अंत फार कठिण होता. शेवटच्या क्षणी अभिनेत्रीच्या सोबत कोणीच नव्हतं. आयुष्यात एकट्या पडलेली अभिनेत्री पुणे येथील ‘आरोही’ बंगल्यात एकटीचच राहत होती. 1998 मध्ये ललिता हिने अखेरचा श्वास घेतला.

ललिता मृत्यू झाला तेव्हा पती रुग्णालयात होते आणि मुलगा त्याच्या कुटुंबासोबत मुंबईत होता… निधनानंतर देखली तीन दिवस कोणालाच माहिती नव्हती की, अभिनेत्रीचं निधन झालं आहे. एकेदिवशी मुलाने फोन केला आणि त्याला कोणतंच उत्तर मिळालं नाही. अखेर, मुलाने पोलिसांना कळवलं आणि घटनास्थळी येत पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा तोडला… तेव्हा ललिता हिचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

Follow Us