AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan’s Daughter | सलग 15 दिवस आमीरच्या मुलीचा उपवास! वजन घटलं की वाढलं? उत्तर इरा खानने दिलंय

इरानं प्रियकर नुपूर शिखरेसोबत फोटो पोस्ट करताना जर्मनीत काय काय केलं याबाबत लिहिलंय. सोमवारी तिनं पोस्ट करत सेल्फ इमेज डिपार्टमेन्ट आणि सेल्फ मोटिवेशनवर काम केल्यानं इरानं म्हटलंय. याबाबतनं रितसर सविस्तर पोस्टही लिहिली आहे.

Aamir Khan's Daughter | सलग 15 दिवस आमीरच्या मुलीचा उपवास! वजन घटलं की वाढलं? उत्तर इरा खानने दिलंय
आमीर खानची मुलगी इरा खान आपल्या प्रियकरासोबत
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 7:42 PM
Share

आमीर खानच्या मुलीनं (Aamir Khan’s daughter) जर्मनीतून फोटो शेअर केले आहेत. इराचा (Ira Khan) प्रियकर नुपूर शिखरे सोबत इरानं फोटो शेअर करत जर्मनी नेमकं काय केलं, याची माहिती दिली आहे. इतकंच काय तर गेले 15 दिवस सलग उपवास केल्याचंही आपल्या इन्स्टाग्राम पोस्ट (Instagram Post) मध्ये तिनं म्हटलंय.

का केला उपवास?

इरानं प्रियकर नुपूर शिखरेसोबत फोटो पोस्ट करताना जर्मनीत काय काय केलं याबाबत लिहिलंय. सोमवारी तिनं पोस्ट करत सेल्फ इमेज डिपार्टमेन्ट आणि सेल्फ मोटिवेशनवर काम केल्यानं इरानं म्हटलंय. याबाबतनं रितसर सविस्तर पोस्टही लिहिली आहे. आपल्या वाढलेल्या वजनावर काम करण्याचं तिनं जर्मनीत ठरवलं होतं. त्यासाठी तिनं तब्बल 15 दिवस सलग उपवासही केला. अर्थात असं केल्यानं तिला फारसं यश मिळालं नसलं, तरी तिला एक सूर गवसला आहे. ज्यामुळे तिला एक दिशा मिळाली असल्याचं तिनं म्हटलंय. अजूनही अनेक गोष्टींवर काम करायचं राहून गेलंय. त्यावर काम करण्यासाठी तिला प्रेरणा मिळाल्याचंही इरानं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं.

पाहा इरा खानचा व्हिडीओ –

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

20 किलो वजन वाढलं होतं!

आमीर खानच्या मुलीचं वजन गेल्या चार पाच वर्षात तब्बल वीस किलो वाढलं होतं. इरानं स्वतःच याची कबुलीही आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून दिली आहे. काहीच करत नसल्यामुळे वजन वाढल्याचं तिनं म्हटलंय. वजन वाढल्यामुळे तिचा खूप गोंधळ उडाला होता. डोकं बधिर झालं होतं, असंही तिनं म्हटलंय. अर्थात आता जर्मनीत आल्यानंतर वजन घटवणं, यावर तिला काम करायचं तर होतंच. पण त्यासोबत आता तिला अनेक गोष्टी करण्यासाठीची उर्जा आणि प्रेरणा जर्मनीत येऊन मिळाली आहे. वजन फार कमी झालं नसलं, तरी अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचंही तिनं म्हटलंय.

आता एक आपल्याला एक दिशा मिळाली असून त्याप्रमाणेच सगळंकाही करण्याठी इराचे प्रयत्न सुरु आहेत. आता या नव्या वर्षात नव्या उमेदीनं आणि उर्जेनं वजन घटवण्यासोबत सेल्फ वर्ड डिपार्टमेन्टवर ती काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. आपल्या प्रियकरासोबतचा फोटो शेअर करत तिनं या नव्या वर्षासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना इन्स्टाग्रामवरुन नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

इतर बातम्या –

Celebrities Covid Updates : अभिनेत्री किश्वर मर्चेंटचं 4 महिन्याचं लेकरु कोरोना पॉजिटिव्ह, 24 तासांत 5 सेलिब्रेटींना कोरोनाचा विळखा

I am Not Done Yet | कपिल शर्माने पुन्हा एकदा घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची फिरकी, म्हणाला….

Video | #srivalli | मटकीला मोड नाय, Pushpa मधील स्रीवल्लीच्या मराठी वर्जनला तोड नाय! अमरातवीच्या पोरांची कमाल

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.