AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय कुमारच्या आईची प्रकृती गंभीर, आयसीयूमध्ये दाखल, अभिनेता शुटिंग सोडून मुंबईला परतला

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याची आई अरुणा भाटिया (Aruna Bhatiya) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आईची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून मुंबईला परतला आहे.

अक्षय कुमारच्या आईची प्रकृती गंभीर, आयसीयूमध्ये दाखल, अभिनेता शुटिंग सोडून मुंबईला परतला
अक्षय कुमार आणि त्याची आई
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Sep 06, 2021 | 7:13 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याची आई अरुणा भाटिया (Aruna Bhatiya) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आईची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून मुंबईला परतला आहे. अक्षय त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता.

अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘सिंड्रेला’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. अक्षय त्याच्या आईच्या खूप जवळ आहे. तब्येत बरी नसल्याने त्याने आईसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी तो लगेच भारतात परतला आहे.

कामावर परिणाम होऊ दिला नाही!

अक्षयला त्याचे काम मध्येच सोडणे कधीच आवडत नाही. तो अर्थातच भारतात परतला आहे, पण त्याने निर्मात्यांना शूटिंग चालू ठेवण्यास सांगितले आहे आणि ज्या दृश्यांमध्ये त्याची गरज नाही, ती शूट करायला सांगितली आहेत. त्याच्या उर्वरित कामाची कमीटमेंट देखील चालू आहे. वैयक्तिक त्रास कितीही असला, तरी त्याचा परिणाम कामावर होणार नाही याची काळजी तो नेहमीच घेतो.

‘बेल बॉटम’ चाहत्यांच्या पसंतीस

नुकतीच चित्रपटगृहे उघडल्यानंतर अक्षय कुमारने आपला ‘बेल बॉटम’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अक्षयचा अभिनय आणि लूक चित्रपटात चांगलाच गाजला आहे.

अक्षयच्या चित्रपटांची रांग!

अक्षय कुमारने नुकतेच आपल्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचा ‘सूर्यवंशी’ही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सूर्यवंशीची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्याचे प्रमोशन अक्षय त्याच्या खास स्टाईलमध्ये करतो आहे. याशिवाय अक्षय ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘हाऊसफुल 5’ सारख्या चित्रपटांतून आपले मनोरंजन करणार आहे.

‘राम सेतु’चे चित्रीकरण सुरु करणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय ऑक्टोबरमध्ये ‘राम सेतु’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करेल आणि या वर्षी डिसेंबरपर्यंत चित्रपट पूर्ण करेल. अक्षयने मार्चमध्ये अयोध्येत या चित्रपटाचा मुहूर्त केला होता. यानंतर, त्याला मुंबईत चित्रपटाचे एक लांब शेड्यूल शूट करायचे होते, परंतु लॉकडाऊनमुळे ते शूटिंग पुढे ढकलण्यात आले. अहवालांनुसार, चित्रपटाचा काही भाग श्रीलंकेत शूट केला जाणार होता, परंतु चित्रपट निर्मात्यांनी आता आपली योजना बदलली आहे.

केरळमधील चित्रीकरण रद्द

त्याच वेळी, केरळमध्ये ‘राम सेतु’ चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता, परंतु हे राज्य कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याने, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता चित्रपटाचा एक मोठा भाग गुजरातमध्ये शूट करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त नुसरत भरूचा आणि जॅकलिन फर्नांडिस देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

अभिषेक शर्मा ‘राम सेतु’ दिग्दर्शित करत आहेत. तसे, ‘राम सेतु’ व्यतिरिक्त, अक्षय कुमारच्या हातात अनेक चित्रपट आहेत. त्याने यापूर्वी ‘पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ आणि ‘अतरंगी रे’साठी चित्रीकरण केले आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘बच्चन पांडे’ आणि ‘सूर्यवंशी’ सारखे अनेक चित्रपट आहेत.

हेही वाचा :

‘बिग बॉस तेलुगु’च्या घराची धुरा ‘मास’च्या हाती, पाहा एका भागासाठी किती मानधन आकारतो नागार्जुन अक्किनेनी

 अक्षय कुमार पुढचे दोन महिने गुजरातमध्ये, सुरु करणार ‘राम सेतु’चं नवं शेड्युल!

Follow Us
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
Sanjay Raut | सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा संताप; बापटांच्या भूमिकेला पाठिंबा
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी