AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan Drugs Case | आर्यनच्या जामीनाविरोधात NCB, पुरव्यांशी छेडछाडीचा दावा, मॅनेजर पूजा ददलानीचेही नाव समोर!

मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खान (Aryan Khan Drugs Case) आणि त्याच्या इतर साथीदारांच्या जामिनाला विरोध करत हायकोर्टात उत्तर दाखल केले आहे. या उत्तरात एनसीबीने या खटल्याशी संबंधित साक्षीदारांना खरेदी करून प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

Aryan Khan Drugs Case | आर्यनच्या जामीनाविरोधात NCB, पुरव्यांशी छेडछाडीचा दावा, मॅनेजर पूजा ददलानीचेही नाव समोर!
समीर वानखेडे, एनसीबी अधिकारी
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 26, 2021 | 2:28 PM
Share

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खान (Aryan Khan Drugs Case) आणि त्याच्या इतर साथीदारांच्या जामिनाला विरोध करत हायकोर्टात उत्तर दाखल केले आहे. या उत्तरात एनसीबीने या खटल्याशी संबंधित साक्षीदारांना खरेदी करून प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रभाकर यांचे प्रतिज्ञापत्र फेटाळण्याची मागणीही केली आहे. प्रभाकरने शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांचाही उल्लेख केल्याचा आरोप एनसीबीने केला आहे. पूजा कोणत्याही साक्षीदारावर प्रभाव टाकण्यास सक्षम आहे आणि जामीन मिळाल्याने या खटल्यातील साक्षीदारांवर दबाव वाढू शकतो, हे स्पष्ट आहे. एनसीबीने पुढे सांगितले की, जामीन मिळाल्यानंतर आर्यन परदेशातही पळून जाऊ शकतो.

एनसीबीने न्यायालयाला सांगितले आहे की, या प्रकरणाशी संबंधित अधिकारी आणि साक्षीदारांना टार्गेट करून तपास अडकवला जात आहे. याचा पुरावा म्हणजे या खटल्यातील साक्षीदार प्रभाकर साईल याच्या खटल्याशी संबंधित प्रतिज्ञापत्र कोणत्याही न्यायालयासमोर किंवा अन्य न्यायिक मंडळासमोर हजर करण्यात आले नाही, तर त्याच्यामार्फत मीडिया ट्रायल सुरू आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात असूनही, त्या प्रतिज्ञापत्राला खटल्याच्या कामकाजाचा भाग न बनवता त्याची सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जात आहे. आठ आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याचा ट्रायल कोर्टाचा निर्णय कायम ठेवण्यासाठी एनसीबीने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

शाहरुखच्या मॅनेजरचे नाव समोर

आरोपी आर्यन खानच्या वडिलांची अर्थात शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचे नावही या शपथपत्रात असल्याचे एनसीबीने उत्तरात म्हटले आहे. खटल्याच्या पंचनाम्याशी संबंधित स्वतंत्र साक्षीदारांवर प्रभाव टाकण्यास ते पूर्णपणे सक्षम आहेत. अशा प्रयत्नांतून या प्रकरणाचा तपास खोळंबण्याचे षडयंत्र रचले जात आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचताच प्रभाकर साईलचे हे प्रतिज्ञापत्र समोर आले असून, तपासावर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या आरोपांना उत्तर देताना एनसीबीच्या झोनल डायरेक्टरनेही प्रतिज्ञापत्र सादर केले असून, ते न्यायालयासमोर सादर केले जात आहे.

आर्यनला जामीन का मिळू नये?

एनसीबीने उच्च न्यायालयात दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, अरबाज मर्चंटकडून ड्रग्ज सापडले असले तरी, आर्यन या ड्रग्जच्या खरेदीशी संबंधित वाटाघाटींमध्ये आणि त्यांचा वापर करण्यासाठी क्रूझवर जात होता. दोन्ही आरोपी ड्रग्ज घेण्याच्या उद्देशाने क्रूझवर गेले होते. ज्या ड्रग पॅडलरकडून अरबाजने चरस खरेदी केली होती, त्याच्याकडून अरबाज अनेक वेळा गांजा आणि चरससारखी ड्रग्ज खरेदी केली आहे. आर्यनचे एका परदेशी ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचेही तपासात समोर आले आहे, जो ड्रग्जच्या मोठ्या आणि परदेशी नेटवर्कशी जोडला गेला आहे.

रिया चक्रवर्तीच्या प्रकरणाचा उल्लेख

एनसीबीने आपल्या उत्तरात एनडीपीएस कोर्टाला दिलेल्या उत्तराचा पुनरुच्चार केला आणि म्हटले की, या प्रकरणातील सर्व आरोपींची प्रकरणे एकमेकांशी संबंधित आहेत आणि त्यांना एकाकीपणे पाहिले जाऊ शकत नाही. जरी या लोकांना कमी प्रमाणात ड्रग्ज सापडले असले तरीही, असे पुरावे आहेत जे मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या संबंधाकडे निर्देश करतात. जामीनाला विरोध करताना, एनसीबीने रिया चक्रवर्तीच्या प्रकरणाचा संदर्भ दिला आहे आणि म्हटले आहे की उच्च न्यायालयाने स्वतः असे म्हटले आहे की, एनडीपीएस कायद्यानुसार, प्रकरणाचे स्वरूप आणि सहभागाच्या आधारावर जामिनाचा निर्णय घेतला जातो. अशा प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या संगनमताचा पुरावा असल्यास, या प्रकरणात जामीन न देण्याचे स्पष्ट कारण आहे.

हेही वाचा :

‘माझे पती बॉलिवूडला टार्गेट करत नाहीयत’, समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ पुढे आली पत्नी क्रांती रेडकर!

Aryan Khan Drugs Case | कोकेनचे आश्वासन, 80 हजारांचा गांजा!, आर्यन-अनन्याच्या चॅटमधून नवा खुलासा

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!