AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाला ‘मस्तानी’चा नकार, दीपिका-भन्साळींमध्ये कोल्डवॉर सुरु!

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी 'राम लीला', 'बाजीराव-मस्तानी' आणि 'पद्मावत'सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाला ‘मस्तानी’चा नकार, दीपिका-भन्साळींमध्ये कोल्डवॉर सुरु!
दीपिका पदुकोण-संजय लीला भन्साळी
| Updated on: Mar 28, 2021 | 12:37 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी ‘राम लीला’, ‘बाजीराव-मस्तानी’ आणि ‘पद्मावत’सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. संजय लीला भन्साळी यांना निर्माता आणि अभिनेत्रीची ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा पडद्यावर आणण्याचा विचार करत आहेत. म्हणूनच त्यांनी दीपिका पदुकोणशी संपर्क साधला. पण, अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने चक्क त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला, असा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यामुळे भन्साळी संतप्त झाले आहेत. सध्या या दोघांमध्ये ‘कोल्ड-वॉर’सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे (Bollywood Actress Deepika Padukone reject sanjay leela bhansali next film).

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या अप कमिंग चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटामधील आयटम नंबरसाठी दीपिका पदुकोणशी संपर्क साधला होता. सूत्रांच्या माहितीनुसार दीपिकाने हा आयटम नंबर करण्यास नकार दिला आहे. यानंतर, भन्साळी यांनी दीपिकासमोर ‘हिरा मंडी’ नावाच्या आणखी एका चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून कास्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण, यावेळीसुद्धा दीपिकाने नखरे दाखवत या चित्रपटातही काम करण्यासाठी तिने नकार दिला आहे.

भन्साळी रागाने संतापले!

एकापाठोपाठ एक प्रोजेक्टसाठी भन्साळींना अशाप्रकारे नकार देणे दीपिका पादुकोणला चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. दीपिकाशी चांगले संबंध असूनही तिने काम करण्यास नकार दिला, याचा संजय लीला भन्साळींना राग आला आहे. त्यांना तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अशा परिस्थितीत या नकारानंतर दोघांमध्ये कोणतीही बोलणी झाली नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, दीपिका किंवा संजय लीला भन्साळी यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीय (Bollywood Actress Deepika Padukone reject sanjay leela bhansali next film).

आगामी ‘बैजू बावरा’ चित्रपटावरही होऊ शकतो परिणाम!

दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्यासोबत ‘बैजू बावरा’ नावाचा आणखी एक चित्रपट बनवणार आहेत. त्याचे शूटिंग लवकरच सुरू होणार होते. पण, भन्साळी आणि दीपिका यांच्यात सुरू झालेल्या या कोल्डवॉरचा परिणाम या चित्रपटाच्या शूटिंगवरही होऊ शकतो. तथापि, भन्साळींच्या जवळच्या स्त्रोताचे असे म्हणणे आहे की, ते सध्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात व्यस्त आहेत, त्यामुळे ते दीपिकाशी बोलत नाहीयत. चित्रपटाच्या कामानंतर हे दोघेही एकमेकांशी नक्कीच बोलतील. कारण ते अगदी कुटूंबातील सदस्यांसारखे आहेत आणि ते त्यांना गमावू इच्छित नाहीत.

(Bollywood Actress Deepika Padukone reject sanjay leela bhansali next film)

हेही वाचा :

Video | अभिमन्यूला सोडून लतिका-दौलतची जमली जोडी, लाडक्या ‘सुंदरा’चा ‘वाथी कमिंग’ धमाल डान्स पाहिलात का?

Birthday Special | 12 वर्षांनी मोठ्या गौहरला केले होते डेट, लग्नात अडथळा बनले धार्मिक कारण! वाचा अभिनेता कुशाल टंडनबद्दल…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.