कियारा अडवाणी ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट, नुकतीच एकत्र घेतली होती ज्योतिष्याची भेट!

रिपोर्ट्सनुसार, कियारा सध्या सिद्धार्थ मल्होत्राला (Sidharth Malhotra) डेट करत आहे. दोघेही बर्‍याचदा एकत्र जेवताना किंवा कधी सुट्टीवर जाताना दिसतात. मात्र, ते दोघे नेहमी एकमेकांचा केवळ ‘चांगले मित्र’ म्हणून उल्लेख करतात.

कियारा अडवाणी ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट, नुकतीच एकत्र घेतली होती ज्योतिष्याची भेट!
कियारा अडवाणी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेचा एक भाग बनली आहे. रिपोर्ट्सनुसार, कियारा सध्या सिद्धार्थ मल्होत्राला (Sidharth Malhotra) डेट करत आहे. दोघेही बर्‍याचदा एकत्र जेवताना किंवा कधी सुट्टीवर जाताना दिसतात. मात्र, ते दोघे नेहमी एकमेकांचा केवळ ‘चांगले मित्र’ म्हणून उल्लेख करतात. पण आता कियाराने तिच्या नात्याविषयी खुलासा केला आहे. तिने सिद्धार्थचे नाव न घेता एका अभिनेत्याला डेट करत असल्याचे सांगितले आहे (Bollywood actress Kiara Advani Dating Sidharth Malhotra gossips goes viral).

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा कियाराला विचारले गेले की, ती शेवटच्या वेळी केव्हा डेटला गेली होती? त्याला उत्तर देताना कियारा म्हणाली, ‘मी याच वर्षी सुरुवातीला डेटवर गेले होते.’ नवीन वर्ष सुरू होऊन आता फक्त 2 महिने झाले आहेत आणि कियारा नवीन वर्षाच्या निमित्ताने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीव गेली होती. मालदीवहून आल्यानंतर कियाराने जानेवारीत सिद्धार्थच्या आई-वडिलांचीही भेट घेतली होती.

तिचा प्रियकर तिची फसवणूक करत असल्याचे आढळल्यास ती काय करेल, असे विचारले असता कियारा म्हणाली, ‘मी त्याला ब्लॉक करेन आणि कधीही पुन्हा मागे वळून पाहणार नाही. मी त्याला कधीही माफ करणार नाही आणि कधीही त्याच्याकडे परत जाणारही नाही.’

सिद्धार्थच्या घराबाहेर दिसली कियारा!

 

View this post on Instagram

 

A post shared by SIDHARTH ❤️ KIARA (@sid_kiara__)

(Bollywood actress Kiara Advani Dating Sidharth Malhotra gossips goes viral)

कियारा अडवाणी अनेकदा सिद्धार्थ मल्होत्राच्या घराबाहेर स्पॉट केली जाते. जेव्हा जेव्हा ती सिद्धार्थच्या घरी जाते, तेव्हा ती लगबगीने तिच्या गाडीतून खाली उतरून आत जाते. ज्यानंतर या दोघांच्या रिलेशनशिपच्या बातम्या सतत चर्चेत येत असतात.

ज्योतिष्यांची घेतली भेट

काही काळापूर्वी, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी करण जोहरसमवेत ज्योतिष्याची भेट घेतली होती. तसेच, याचे फोटो शेअर करत त्यांनी लिहिले होते की, शेरशहाच्या रिलीजच्या तारखेविषयी या तिघांची भेट झाली आहे. यावर्षी उन्हाळ्यात शेरशाह प्रदर्शित होणार त्यांनी सांगितले होते. ज्योतिषाबरोबरचा फोटो समोर आल्यानंतर हे दोघे लग्नासाठी कुंडली जुळवण्याकरता गेले होते, असा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात होता.

कियाराकडे चित्रपटांची रांग!

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर कियारा नुकतीच ‘इंदू की जवानी’ चित्रपटात दिसली होती. तथापि, या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता कियारा ‘जुग-जुग जिओ’, ‘शेरशाह’ आणि ‘भूल भुलैया 2’मध्ये दिसणार आहे. ‘शेरशहा’ची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 2 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर ‘जुग-जुग जिओ’मध्ये कियारा आणि वरुण धवन ही जोडी दिसणार आहे. या चित्रपटातील या दोघांसोबत अभिनेते अनिल कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूरही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

(Bollywood actress Kiara Advani Dating Sidharth Malhotra gossips goes viral)

हेही वाचा :

Video | जान्हवी कपूर विसरा, जब्याच्या शालूचा ‘नदियो पार…’ अंदाज पाहा!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI