AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूड ‘क्वीन’ पडलीये प्रेमात! कंगना रनौतकडून रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा, अभिनेत्री म्हणतेय…

बॉलिवूडची ‘धाकड’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलत असते. ती कोणत्याही मुद्द्यावर बेधडकपणे बोलायला मागेपुढे पाहत नाही. आता कंगनाने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे की, ती एका खास व्यक्तीसोबतरिलेशनशिपमध्ये आहे.

बॉलिवूड ‘क्वीन’ पडलीये प्रेमात! कंगना रनौतकडून रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा, अभिनेत्री म्हणतेय...
Kangana Ranaut
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 11:19 AM
Share

मुंबई : बॉलिवूडची ‘धाकड’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलत असते. ती कोणत्याही मुद्द्यावर बेधडकपणे बोलायला मागेपुढे पाहत नाही. आता कंगनाने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे की, ती एका खास व्यक्तीसोबतरिलेशनशिपमध्ये आहे. कंगनाच्या या खुलाशाने तिचे चाहते खूप आनंदी झाले आहेत.

इतकंच नाही तर, कंगनाने असंही सांगितलं की, तिला पुढच्या 5 वर्षांत लग्न करायचं आहे आणि मुलंही हवी आहेत. तिच्या बॉयफ्रेंडबद्दलची अधिकची माहिती कंगना लवकरच सगळ्यांना देणार आहे. नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर कंगनाने हा खुलासा केला आहे.

कंगना लग्न करण्याच्या विचारात!

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने याचा खुलासा केला आहे. खरं तर, कंगनाला विचारण्यात आलं होतं की, ती पुढील 5 वर्षात स्वतःका कुठे पाहते. तर अभिनेत्री म्हणाली, मला लग्न करायचे आहे आणि नंतर मुलेही हवी आहेत. येत्या 5 वर्षांत मी स्वत:ला एक आई म्हणून पाहणार आहे.

‘तो’ कोण लवकरच सांगेन…

कंगनाला विचारण्यात आले की, ती आई आणि पत्नी होण्यासाठीच्या मिशनवर काम करत आहे का? तर अभिनेत्री हसली आणि म्हणाली, हो. त्यानंतर कंगनाला तिच्या जोडीदाराबद्दल विचारले असता ती म्हणाली, तुम्हाला लवकरच कळेल.

जेव्हा कंगनाला पुन्हा विचारण्यात आले की, ती प्रेमात आणि नात्यात आनंदी आहे का, तेव्हा ती म्हणाली, “हो, नक्कीच आणि लवकरच तुम्हाला उर्वरित तपशील कळतील.”

कंगनाचे व्यावसायिक जीवन

कंगनाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री असण्यासोबतच ती एक प्रोड्युसर देखील आहे. अलीकडेच कंगनाने तिच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन साई कबीर यांनी केले आहे. त्याचबरोबर कंगनाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

अनेक चित्रपटांची रांग…

याशिवाय कंगनाकडे अभिनेत्री म्हणूनही अनेक चित्रपट आहेत. ‘मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिड्डा’, ‘इमर्जन्सी’, ‘धाकड’, ‘तेजस’, ‘अपराजिता अयोध्या’ आणि ‘द इनकारनेशन: सीता’ या चित्रपटातही ती दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कंगनाने जे जयललिता यांची भूमिका साकारली होती आणि यामध्ये अभिनेत्रीने जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणी होण्याचा प्रवास दाखवला होता. कंगनाचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. एकूणच या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा :

बोल्ड अवतारात जान्हवी कपूरने वाढवला वाळवंटाचाही पारा! फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘हाय गर्मी….’

Birth Anniversary | कधीकाळी बस कंडक्टर म्हणून करायचे काम, ‘सर्वोत्कृष्ट विनोदवीर’ बनण्यामागे जॉनी वॉकर यांचा मोठा संघर्ष!

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.