जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने घेतला अत्यंत महत्वाचा निर्णय, वाचा…

| Updated on: Sep 13, 2022 | 11:12 AM

अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. राबिया खान यांनी न्यायालयात याचिका दाखल करून नव्याने तपास करण्याची विनंती केली होती. मात्र, आता खंडपीठाने सुनावणी करत ही याचिका फेटाळून लावलीयं.

जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने घेतला अत्यंत महत्वाचा निर्णय, वाचा...
Follow us on

मुंबई : अभिनेत्री जिया खानची (Jiah Khan) आई राबिया खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने राबिया खान यांची याचिका फेटाळून लावलीयं. जिया खानच्या आईने कथित आत्महत्या (Suicide) प्रकरणी नव्याने चौकशी करण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती एमएन जाधव आणि एएस गडकरी यांच्या खंडपीठाने सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एजन्सीवर विश्वास आहे. जिया खानचा बॉयफ्रेंड सूरज पांचोली याच्यावर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप (Accusation) करण्यात आला होता.

जिया खानच्या आईने केला मोठा आरोप

अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. राबिया खान यांनी न्यायालयात याचिका दाखल करून नव्याने तपास करण्याची विनंती केली होती. मात्र, आता खंडपीठाने सुनावणी करत ही याचिका फेटाळून लावलीयं. जिया खानच्या आईला असे वाटते की, जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आलीयं. याप्रकरणीच जियाच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावर सोमवारी सुनावणी झालीयं.

हे सुद्धा वाचा

जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालय म्हणाले की…

जिया खानच्या मृत्यूनंतर तिच्या आईने अभिनेता सूरज पांचोलीवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. सूरज पांचोली हा अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा आहे. जिया खानच्या आईने सूरजवर जियाला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला होता. राबिया खान यांनी सूरजसोबत पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले. राबिया म्हणाल्या की, माझ्या मुलीने आत्महत्या केली आहे हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी कोणतेही पुरावे गोळा केलेले नाहीत. माझ्या मुलीची हत्या करण्याच आलीयं.