AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anushka & Virat : अनुष्कासोबत विराट यूकेमध्ये घालवतोय ‘क्वालिटी’ टाइम

ष्का शर्माच्या या पोस्टवर चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. शिबानी दांडेकर आणि झोया अख्तर यांनीही हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. यूजर्स दोघांच्या फोटोंवर खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे.

Anushka & Virat : अनुष्कासोबत विराट यूकेमध्ये घालवतोय 'क्वालिटी' टाइम
Anushka & ViratImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 12, 2022 | 7:05 PM
Share

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka  Sharma)आणि क्रिकेटर विराट कोहली(Virat Kohli) हे चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. अनेकदा चाहते त्यांना परफेक्ट कपलही म्हणतात. दोघेही सोशल मीडियावर(Social Media) खूप सक्रिय असतात आणि एकमेकांसोबत फोटो शेअर करताना दिसतात. अनुष्का शर्मा सध्या यूकेमध्ये आहे, जिथे तिचा आगामी चित्रपट ‘चकदा एक्सप्रेस’ ची शूटिंग सुरू आहे. दरम्यान, अनुष्काने विराट कोहलीसोबतचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.विराट कोहली नुकताच आशिया कप 2022 साठी UAE मध्ये होता. त्यानंतर तो अनुष्काला यूकेमध्ये जॉईन केला. फोटो पाहून असे म्हणता येईल की अनुष्का आणि विराट क्वालिटी टाइम घालवत आहेत. दोघेही मोकळ्या जागेत कॉफी टेबलवर बसले आहेत.

सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. फोटोंमध्ये ती आणि विराट कॉफी डेट एन्जॉय करताना दिसत आहेत. अनुष्काने तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या दोन फोटोंमध्ये अनुष्का आणि विराटचा चेहरा दिसत नाहीये. त्याचवेळी, तिसरा फोटो प्रत्यक्षात सेल्फीचा आहे, ज्यामध्ये दोघेही हसताना दिसत आहेत. विराट कोहली नुकताच आशिया कप 2022 साठी UAE मध्ये होता. त्यानंतर तो अनुष्काला यूकेमध्ये जॉईन केला. फोटो पाहून असे म्हणता येईल की अनुष्का आणि विराट क्वालिटी टाइम घालवत आहेत. दोघेही मोकळ्या जागेत कॉफी टेबलवर बसले आहेत. पोस्टसोबतच अनुष्काने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अनुष्काने गुलाबी जॉगर्ससह काळ्या रंगाचा स्वेटशर्ट घातला आहे. त्याचबरोबर विराटने ब्लॅक जीन्स आणि ऑलिव्ह जॅकेट घातलेला दिसत आहे.

कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया

अनुष्का शर्माच्या या पोस्टवर चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. शिबानी दांडेकर आणि झोया अख्तर यांनीही हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. यूजर्स दोघांच्या फोटोंवर खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे. सध्या ती ‘चकडा एक्स्प्रेस’चे शूटिंग करत आहे. हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. अनुष्का 2018 मध्ये आलेल्या ‘झिरो’ चित्रपटात शेवटची दिसली होती.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.