AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Roohi Reaction | जान्हवीला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहून भावूक झाले बोनी कपूर, म्हणाले ‘श्रीदेवी असती तर…’

‘हवाहवाई’ अभिनेत्री श्रीदेवीची लेक आणि बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूरसाठी शुक्रवारचा दिवस खूप मोठा होता. काल (11 मार्च) जान्हवी कपूरचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘रुही’ प्रदर्शित झाला आहे.

Roohi Reaction | जान्हवीला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहून भावूक झाले बोनी कपूर, म्हणाले ‘श्रीदेवी असती तर...’
जान्हवी कपूर
| Edited By: | Updated on: Mar 12, 2021 | 8:29 AM
Share

मुंबई : ‘हवाहवाई’ अभिनेत्री श्रीदेवीची लेक आणि बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूरसाठी शुक्रवारचा दिवस खूप मोठा होता. काल (11 मार्च) जान्हवी कपूरचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘रुही’ प्रदर्शित झाला आहे. इतकेच नाही तर, जान्हवी कपूरचे वडील निर्माते बोनी कपूर यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे. आपल्या लेकीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहून बोनी कपूर यांना खूप आनंद झाला आहे (Boney kapoor first reaction on janhvi kapoor’s acting in roohi film).

चित्रपटाविषयी बोलताना बोनी कपूर म्हणाले की, ‘हा हॉरर-कॉमेडी चित्रपट खरोखर भितीदायक आहेच आणि चित्रपटात अनेक पोट धरून हसायला लावणारे क्षण देखील आहेत. चित्रपटाच्या मजेदार कथेमुळे एकतर प्रेक्षकांना हसू तरी आले असेल किंवा अलौकिक शक्तीवरील त्यांचा विश्वास आणखी दृढ तरी होईल.’ इतकेच नाही तर, माध्यमांशी केलेल्या संभाषणात बोनी कपूर यांनी म्हटले की, ‘जर भविष्यात कोणी जान्हवीच्या वडिलांसाठी एखादे पात्र लिहित असेल, तर मला स्वत:ला ती भूमिका करायला आवडेल.’

…तर जान्हवीबद्दल खूप अभिमान वाटला असता!

चित्रपटाच्या कलाकारांविषयी बोलताना बोनी कपूर म्हणतात की, ‘जान्हवी, राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांनी ‘रुही’मध्ये अप्रतिम काम केले आहे. जान्हवी खूप मेहनत घेत आहे. तिला प्रत्येक चित्रपटासह आणखी चांगलं व्हायचं आहे. जर, आज तिची आई असती, तर तिला जान्हवीबद्दल खूप अभिमान वाटला असता.’(Boney kapoor first reaction on janhvi kapoor’s acting in roohi film)

अशी आहे चित्रपटाची कथा

‘रुही’ची कहाणी एका चेटकिणीची आहे, जी लग्न सोहळा असणाऱ्या घरांवर नजर आहे. नवरदेव झोपला की, ती नववधूला आपल्याबरोबर घेऊन जाते. राजकुमार राव आणि वरुण शर्मा हा जादूटोणा दूर करण्याची जबाबदारी स्वीकारतात. यासाठी दोघही जान्हवीला पळवून नेतात आणि तिच्या आतून चेटकीण बाहेर कढण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. या सगळ्यामध्ये प्रेक्षकांना कॉमेडी देखील पाहायला मिळणार आहे.

दिनेश विजन ‘रुही’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. राजकुमार राव आणि दिनेश विजान या चित्रपटात प्रथमच एकत्र येत नाहीयत, तर त्याआधी दोघांनी ‘स्त्री’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात एकत्र काम केले होते. राजकुमार राव ‘स्त्री’मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर त्याच्यासोबत दिसली. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यामुळेच ‘रूही’ या चित्रपटाची बरीच प्रतीक्षा होती आणि आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट पाहून चाहते खूप खुश झाले आहेत.

(Boney kapoor first reaction on janhvi kapoor’s acting in roohi film)

हेही वाचा :

Radhe Shyam | महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ‘राधे-श्याम’चे नवे पोस्टर प्रदर्शित, पाहा पूजा-प्रभासचा रोमँटिक अंदाज

Sonu Sood | ‘एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण चुकणार नाही!’ सोनू सूदचा ठाम निश्चय, ऑनलाईन शिक्षणासाठी देणार मोबाईल!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.