100 वेळा ब्रश… व्हिलनने चुकून अभिनेत्रीला केलं किस, त्यानंतर भडाभडा उलट्या
नव्वदच्या दशकात अभिनेत्री रवीना टंडनने 'नो किसिंग पॉलिसी' पाळली होती. एका सीनदरम्यान खलनायकाने चुकून तिला किस केले, ज्यामुळे तिला तीव्र मळमळ झाली. ती इतकी अस्वस्थ झाली की तिने थेट उलटी केली आणि अभिनेत्याला '100 वेळा ब्रश' करायला सांगितले. ओटीटीच्या जमान्यात किसिंग सामान्य असले तरी, त्यावेळी रवीनाचा हा किस्सा खूप चर्चेत राहिला होता.

आज ओटीटीचा जमाना आहे. त्यामुळे ओटीटीवरील प्रत्येक सीरीजमध्ये किसिंग सीन असतोच असतो. सिनेमात ही गोष्ट आता कॉमन झाली आहे. पण एकेकाळी किसिंग सीन ही सामान्य गोष्ट नव्हती. त्यावेळी अभिनेत्री किसिंग सीनला मना करायच्या. त्याला विरोध करायच्या. नो किसिंग पॉलिसीवरच त्या सिनेमात काम करायच्या. त्यामुळे जुन्या सिनेमाशी संबंधित अनेक किस्से नेहमी व्हायरल होत असतात. हे किस्से ऐकल्यावर अनेकांना हसू फुटतं. पण काळाच्या संदर्भानं पाहिलं तर त्यावेळी अभिनेत्रींनी घेतलेली भूमिका योग्यच असायची.
एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा किस्सा प्रसिद्ध आहे. तिच्याबाबत असं काही घडलं की तिचा तिला अंदाजही आला नाही. या अभिनेत्रीला खलनायकाची भूमिका करणाऱ्या नटाने चुकून किस केलं. त्यानंतर या अभिनेत्रीला प्रचंड मळमळ झाली. इतकी भयंकर की ती आपल्या रुममध्ये जाऊन भडाभडा उलट्या करू लागली.
किस नकोच
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रवीना टंडन आहे. नव्वदच्या दशकात रवीना टॉपला होती. त्यावेळी ती सुद्धा सिनेमात काम करताना एक अट ठेवायची. कोणत्याही अभिनेत्याला किस करणार नाही, अशी तिची अट असायची. तिनेही नो किसिंग पॉलिसी फॉलो केली होती. पण एकदा सेटवर को स्टारशी चुकून किस करण्यात आला. त्यानंतर तिची जी अवस्था झाली ती भयानक होती. एका मुलाखतीत तिने त्याचा उल्लेख केला आहे.
मला आठवतंय. एका अभिनेत्यासोबत मी रफ हँडलिंग सीन करत होते. त्यावेळी चुकून त्याचे ओठ माझ्या ओठांना लागले. हे चुकून झालं होतं. त्या सीनमध्ये त्याची गरजही नव्हती. ही एक चूक होती. जी अनावधानाने झाली होती. त्यानंतर मी माझ्या रुममध्ये गेले आणि उलटी केली. कारण मला ते किळसवाणं वाटत होतं. मला ते सहनच झालं नाही. मी त्याला म्हणाले, छी… नको. प्लीज दात साफ करा. 100 वेळा ब्रश करा. तुझं तोंड 100 वेळा धुवून काढ, असं रवीनाने सांगितलं.
माफी मागितली
हे केवळ चुकून झालं होतं. या सिनेमात खलनायकाची भूमिका करणाऱ्या या कलाकाराने या चुकीबद्दल माफीही मागितली होती. तो कलाकार खलनायकाची भूमिका करत होता आणि वारंवार माफी मागत होता. मी त्याला म्हटलं ही एक चूक होती, असंही तिने स्पष्ट केलं. दरम्यान, रवीनाने या कलाकाराचं नाव सांगितलं नाही. त्यावेळी नो किसिंग पॉलिसीबाबत कोणतंही कॉन्ट्रॅक्ट होत नव्हतं. तरीही मी किसिंग सीन देत नव्हते असं तिने म्हटलंय.