दीपिका पादुकोणच्या कमाईचा आकडा पाहून डोळे नक्कीच चक्रावतील, वाचा अभिनेत्रीची नेमकी किती संपत्ती

630 कोटींची मालकीण असलेल्या दीपिका पादुकोनला महागडे कपडे प्रचंड आवडतात इतकेच नाही तर दीपिकाने आतापर्यंत तिच्या कमाईमधील काही महत्वाचा हिस्सा रिअल इस्टेटमध्येही लागलायं.

दीपिका पादुकोणच्या कमाईचा आकडा पाहून डोळे नक्कीच चक्रावतील, वाचा अभिनेत्रीची नेमकी किती संपत्ती
| Updated on: Sep 19, 2022 | 2:37 PM

मुंबई : दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंहची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. दीपिकाने नुकताच अलिबागमध्ये एक बंगला घेतलाय. ज्याच्या पूजेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत रणबीरने चाहत्यांना माहिती दिली होती. 2007 पासून दीपिकाने आपल्या बाॅलिवूड (Bollywood) करिअरला सुरूवात केलीये. आतापर्यंत दीपिकाने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. ‘पद्मावत’ सारख्या चित्रपटात (Movie) जबरदस्त अभिनय करून दीपिकाने बाॅलिवूडमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. इतकेच नाही तर बाॅलिवूडमध्ये सर्वात जास्त फी घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी दीपिका एक आहे. 2007 पासून दीपिकाने खूप संपत्ती कमावलीये.

कमाईमध्ये दीपिकाने रणवीर सिंहलाही टाकले मागे

दीपिका पादुकोणचे नाव काढले की, आपल्या डोळ्यांसमोर चेन्नई एक्सप्रेस, रामलीला, बाजीराव मस्तानी असे हीट चित्रपट येतात. दीपिका पदुकोणची एकूण संपत्ती 630 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे कमाईमध्ये दीपिका रणवीर सिंहला देखील मागे टाकते. दीपिका पादुकोण आज एक भारी लाईफस्टाईल जगते. तिने लक्झरी वाहनांसाठी खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आहे.

एका चित्रपटासाठी दीपिका घेते तब्बल इतके कोटी

630 कोटींची मालकीण असलेल्या दीपिका पादुकोणला महागडे कपडे प्रचंड आवडतात. इतकेच नाही तर दीपिकाने आतापर्यंत तिच्या कमाईमधील काही महत्वाचा हिस्सा रिअल इस्टेटमध्येही गुंवतलाय. दीपिका पादुकोणने इतके हीट चित्रपट दिल्याने साहजिकच आहे की, तिची फी जास्तच असणार. एका चित्रपटासाठी दीपिका तब्बल 15 ते 30 कोटी रूपये घेत असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.