AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘एक्स अँड नेक्स्ट’ जेव्हा दीपिका-आलिया एकत्र गातात रणबीरचं ‘चन्ना मेरेया’ गाणं, पाहा व्हिडीओ

एकदा रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padikone) आणि सध्या रणबीरसोबत नात्यात असलेल्या आलिया भट्ट (Alia Bhatt) या दोन्ही अभिनेत्रींनी एकत्र हे गाणे गायले होते.

Video | ‘एक्स अँड नेक्स्ट’ जेव्हा दीपिका-आलिया एकत्र गातात रणबीरचं ‘चन्ना मेरेया’ गाणं, पाहा व्हिडीओ
दीपिका पदुकोण - आलिया भट्ट
| Updated on: May 04, 2021 | 12:12 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातील ‘चन्ना मेरेया’ या गाण्याने सर्वांचे मन जिंकले आहे. आजही हे गाणे लोकांच्या हिट लिस्टचा एक भाग आहे. एकदा रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padikone) आणि सध्या रणबीरसोबत नात्यात असलेल्या आलिया भट्ट (Alia Bhatt) या दोन्ही अभिनेत्रींनी एकत्र हे गाणे गायले होते. होय, करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये दीपिका आणि आलियाने एकत्र हे गाणे गायले होते, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे (Deepika Padukone And Alia Bhatt sings channa mereya song on koffee with karan show).

2018मध्ये करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण’मध्ये दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट एकत्र आल्या होत्या. रॅपिडफायर फेरीमध्ये करण जोहरने दीपिका पदुकोणला रणबीर कपूरबद्दल काही प्रश्न विचारले, ज्यांचे उत्तर अभिनेत्रींनी सडेतोड उत्तरे दिली. दीपिकाला विचारले गेले की, रणबीरमध्ये तुम्हाला काय आवडते आणि काय आवडत नाही. त्यावर ती म्हणाली, मला असे वाटते की त्याला कधी राग येत नाही. मला ही गोष्ट आवडतेही आन्ही नावडतेही…दुर्लक्ष करण्यावर दीपिका म्हणाली की, तो आपल्या भावना व्यक्त करत नाही. मला वाटतं या सर्व गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत.

पाहा आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोणचा व्हिडीओ

असाच प्रश्न दीपिकाला आलियाबद्दल विचारला गेला. त्यावर ती म्हणाली, तिला आलियाचे बोलणे खूप आवडते. ती म्हणते, मी तिला चांगल्या प्रकारे ओळखत नाही, त्यामुळे तिच्यात आवडत नाही अशी कोणतीही गोष्ट नाही आणि मी तिचे ढेकर दुर्लक्षित करू शकते (Deepika Padukone And Alia Bhatt sings channa mereya song on koffee with karan show).

दीपिकाकडे चित्रपटांची रांग

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, दीपिका पादुकोण लवकरच रणवीर सिंगसोबत कबीर खानच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती कपिल देव यांची पत्नी रोमीची भूमिका साकारत आहे. याशिवाय ती शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसह ‘पठाण’मध्ये, शकुन बत्राच्या चित्रपटात सिद्धांत आणि अनन्या पांडेसोबत दिसणार आहे. याशिवाय ती हृतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटातही दिसणार आहे.

आलिया भट्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

अभिनेत्री आलिया भट्टविषयी बोलायचे तर, ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 30 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पण आता आलेल्या वृत्तानुसार हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होऊ शकतो. याशिवाय आलिया एसएस राजामौलीच्या ‘आरआरआर’ चित्रपटात राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि अजय देवगण यांच्यासोबत दिसणार आहे.

(Deepika Padukone And Alia Bhatt sings channa mereya song on koffee with karan show)

हेही वाचा :

Death Rumour | नव्वदच्या दशकांत चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या मीनाक्षी शेषाद्रीच्या निधनाच्या अफवा, चाहतेही हैराण!

Puglya | मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान, ‘पगल्या’ला तुर्की-ओन्कोमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार!

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.