डोक्यावर 9 कोटींचं कर्ज, जेलमध्ये जाताच राजपाल यादवचं नशीब फळफळलं, होणार मालामाल

चेक बाउंस प्रकरणात सध्या अभिनेता राजपाल यादव तिहार जेलमध्ये आहे, त्याच्यावर 9 कोटी रुपयांचं कर्ज आहे. आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली असून, राजपाल यादवला मोठा दिलासा मिळाला आहे.

डोक्यावर 9 कोटींचं कर्ज, जेलमध्ये जाताच राजपाल यादवचं नशीब फळफळलं, होणार मालामाल
rajpal yadav
Image Credit source: टीव्ही 9 हिंदी
| Updated on: Feb 15, 2026 | 10:03 PM

अभिनेता राजपाल यादव सध्या चेक बाउंस प्रकरणात तिहार जेलमध्ये आहे. त्याच्या डोक्यावर 9 कोटींचं कर्ज आहे. राजपाल यादव याची रवानगी जेलमध्ये होताच आता संपूर्ण बॉलिवूड त्याच्या मदतीसाठी धावून आलं आहे. चित्रपट दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मोठी घोषणा केली आहे. राजपाल यादवच्या पुढच्या चित्रपटाची फीस वाढवण्यात आली आहे. मिड डे ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियदर्शन यांनी म्हटलं आह की, मी राजपाल यादवला वीस वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ओळखतो. मी त्यांना पहिल्यांदा जंगल चित्रपटामध्ये पाहिलं होतं. त्यांनी जंगलमध्ये जी भूमिका केली ती पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो. मी त्यांच्यासोबत मालामाल वीकली हा पहिला चित्रपट केला. त्यानंतर त्यांनी माझ्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. राजपाल यादव यांची सध्याची स्थिती पाहून मी पुढच्या चित्रपटामध्ये त्यांची फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

माझ्या पुढच्या चित्रपटाचे निर्मता असलेल्या जुबली फिल्म्सला सांगितलं आहे की, राजपाल यादवच्या फीमध्ये वाढ करा, त्यांना इतरांपेक्षा जास्त मानधन द्या. आपल्याला राजपाल यादव यांना वाचवायचं आहे. माझा हा प्रस्ताव निर्मात्याने मान्य केल्याची माहिती प्रियदर्शन यांनी दिली आहे. माझ्या पुढच्या चित्रपटामध्ये राजपाल यादव हे व्हिलनचा रोल करणार असल्याची माहिती देखील यावेळी प्रियदर्शन यांनी दिली आहे. ते पुढे बोलताना असं देखील म्हणाले की राजपाल यादवच्या समस्येची मला पूर्वीपासूनच कल्पना होती. मला त्यांच्या परिस्थितीची जाणीव होती, त्यामुळेच मी माझ्या प्रत्येक चित्रपटासाठी त्यांना साईन करायचो. मी त्यांना जाहिरातीमध्ये देखील काम दिलं. त्यांच्याकडून चूक झाली आहे, आर्थिक समज नसल्यामुळे ही चूक झाली आहे, मात्र चुकीच्या उद्देशानं त्यांनी ही चूक केलेली नाही.

राजपाल यादव सध्या चेक बाउंस प्रकरणात तिहार जेलमध्ये आहे. 5 फेब्रुवारीला राजपाल यादव याने जेलमध्ये सरेंडर केलं होतं, तेव्हापासून तो जेलमध्येच आहे. राजपाल यादवच्या जामीन अर्जावर 12 फेब्रुवारी रोजी दिल्ली हाय कोर्टामध्ये सुनावणी झाली होती. मात्र त्याचा जामीन अर्ज हाय कोर्टानं फेटाळून लावला, सोबतच त्याला न्यायालयानं चांगलंच फटकारलं देखील होतं, दरम्यान राजपाल यादव सध्या जेलमध्ये असून, त्याचं हे कर्ज फेडण्यासाठी आता बॉलिवूड त्याच्या मदतीला धावून आल्याचं पहायला मिळत आहे.