AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Kundra Case | क्रिप्टो करेंसीमध्ये कमाई, राज कुंद्राच्या काळ्या पैशाचे रहस्य पीएनबी बँके खात्यात!

अश्लील चित्रपट बनवून ते विकल्या प्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्राच्या (Raj Kundra) काळ्या पैशाचे रहस्य पीएनबी बँके खात्यात दडले आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांचे पीएनबी बँकेत संयुक्त खाते आहे.

Raj Kundra Case | क्रिप्टो करेंसीमध्ये कमाई, राज कुंद्राच्या काळ्या पैशाचे रहस्य पीएनबी बँके खात्यात!
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा
| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 12:56 PM
Share

मुंबई : अश्लील चित्रपट बनवून ते विकल्या प्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्राच्या (Raj Kundra) काळ्या पैशाचे रहस्य पीएनबी बँके खात्यात दडले आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांचे पीएनबी बँकेत संयुक्त खाते आहे. याशिवाय राज कुंद्रा यांचेही पीएनबीमध्ये सिंगल (एकट्याचे) खाते देखील आहे, ज्यामध्ये 2016 पासून कोणताही व्यवहार झालेला नाही.

प्लेसमेंट लेअरिंग आणि इंटीग्रेशन अंतर्गत, इतर खात्यात पैसे लपवले गेले आहेत. राज कुंद्राच्या बँक खात्याच्या  तपास गुन्हे शाखेची 4 सदस्यांची टीम करत आहे. कोरोना काळात राज कुंद्राची कमाई क्रिप्टो करेंसीमध्ये झाली आहे. ‘सीक्रेट अलमारी’मध्ये आढलेळल्या कागद पत्रांच्या आधारे हा खुलासा झाला असल्याचे म्हटले जात आहे.

राज कुंद्रा यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यातीलच एक म्हणजे त्यांच्या खात्यात रोज होणारं लाखो रुपयांचं डिपॉझिट! राज कुंद्रा यांचे काही बँक डिटेल्स हाती लागले आहेत. त्यात Hotshots डिजिटल प्लॅटफॉर्मवर अश्लील चित्रपट टाकून राज कुंद्रा यांच्या खात्यात रोज किती रुपये जमा होत होते याची आकडेवारी समोर आली आहे.

दिवसाला तब्बल 10 लाखांची कमाई!

हाती लागलेल्या एक्स्क्लुझिव्ह बँक डिटेल्सनुसार राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी दिवसाला 1 ते 10 लाख रुपये कमवत होते. त्यांच्या बँक अकाऊंटवर रोज लाखो रुपये जमा होत असल्याचं बँक डिटेल्सवरुन उजेडात आलं आहे. ही रोजची आकडे लाखो रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या उद्योगातून राज कुंद्रा हे किती रुपयांची कमाई करत होते, याचा अंदाज बांधणही कठीण आहे.

..तर राज कुंद्रा यांना 3 वर्षाचा तुरुंगवास!

राज कुंद्रा यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे आहेत. त्यांच्याविरोधात अनेक आयपीसी कलमांसोबतच आयटी अॅक्ट कलम 67, 67A लावले गेले आहेत. त्यातील 67A हे पोर्नोग्राफी संदर्भात आहे. तो अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यात पहिल्यांना गुन्हा केला असेल तर 3 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड आकारला जातो. एकाच व्यक्तीने दुसऱ्या वेळीही तोच गुन्हा केल्यानंतर तर त्याला 5 वर्षाची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड आहे. तर तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास 7 वर्षाची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंडाची तरदूत असल्याची माहिती कायदे विशेषज्ञ आणि सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी यांनी दिलीय.

(Earnings in cryptocurrency, secret of Raj Kundra’s black money in PNB bank account)

हेही वाचा :

Raj Kundra Case : उमेश कामतच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समधून खुलासा, गेहना वसिष्ठचं फक्त ‘हॉटशॉट’च नाही तर ‘हॉटहिट’ मध्येही काम

Raj Kundra Case : पूनम पांडे, सागरिका शोनानंतर आता ‘या’ मॉडेलचे गंभीर आरोप, म्हणाली, न्यूड फोटोशूटसाठी मोठ्या रकमेची ऑफर होती

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.