सलमान खान फक्त 5 रुपयांच्या वेलचीमुळे कायद्याच्या कचाट्यात, संपूर्ण प्रकरण नक्की काय?

Salman Khan : भाजप नेत्याने सलमान खानला कोर्टात खेचलं..., 5 रुपयांपासून सुरु झालेला वाद पोहोचला कोर्टात, संपूर्ण प्रकरण नक्की काय? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा...

सलमान खान फक्त 5 रुपयांच्या वेलचीमुळे कायद्याच्या कचाट्यात, संपूर्ण प्रकरण नक्की काय?
फाईल फोटो
| Updated on: Nov 05, 2025 | 1:25 PM

Salman Khan : अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण अभिनेता वादग्रस्त प्रकणांमुळे अधिक चर्चेत असतो. आता देखील अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. फक्त 5 रुपयांच्या प्रकरणामुळे भाजप नेत्याने सलमान खान याला कोर्टात खेचलं आहे. कोटा ग्राहक न्यायालयाने सलमान खान याला नोटीस बजावली आहे. कोटा येथील एका ग्राहक न्यायालयाने राजश्री वेलचीच्या जाहिरातींबाबत अभिनेत्याला नोटीस बजावली आहे.

कोटा ग्राहक वाद निवारण आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेतून हे प्रकरण टोकाला पोहोचलं आहे. तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की, जाहिराती “केशरयुक्त वेलची” आणि “केशरयुक्त पान मसाला” यांचा खोटा प्रचार करण्यात आला आहे.

भाजप नेते आणि राजस्थान उच्च न्यायालयाचे वकील इंदर मोहन सिंग हनी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सलमान खान ज्या राजश्री वेलची ब्रँडचा प्रचार करत आहे. जाहिरातींमध्ये अभिनेता ‘केशरयुक्त वेलची’ आणि ‘केशरयुक्त पान मसाला’ असं दावे करतना दिसत आहे. जेव्हा फक्त 5 रुपयांमध्ये केशर मिळणं अशक्य आहे. कारण केशरची किंमत 4 लाख रुपये प्रति किलो आहे..

इंदर मोहन सिंग यांच्या म्हणण्यानुसार, ‘सलमान खान अनेक तरुणांच्या प्रेरणास्थानी आहे. परदेशात सेलिब्रिटी कोल्ड ड्रिंग्स देखील प्रमोट करत नाहीत. पण आपल्या देशात तंबाखू आणि पान मसाला विकत आहे.. पान मसाला तोंडाच्या कॅन्सरसाठी मुख्य कारण आहे… आम्ही आधीच कोटा ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली आहे आणि नोटिस बजावण्यात आली आहे.’

27 नवंबर को अगली सुनवाई

केशरची किंमत प्रति किलो 3 – 4 लाख रुपये आहे, तर प्रॉडक्टची किंमत फक्त 5 रुपये आहे. हे ग्राहक संरक्षण कायदा 2019 चं उल्लंघन आहे. अशात न्यायालयाने उत्पादन कंपनी राजश्री ग्रुप आणि सलमान खान या दोघांनाही नोटीस बजावली आहेत. सुनावणी 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

सांगायचं झालं तर, सलमान खान राजश्री वेलचीच्या जाहिरातींमध्ये दिसला आहे. पण, तो थेट पान मसाला उत्पादनाच्या जाहिरातींमध्ये दिसलेला नाही. याप्रकरणी अद्याप सलमान खान याची कोणतीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही.