प्रसिद्ध अभिनेत्याचे प्रत्येक वयातील महिलेसोबत शारीरिक संबंध, बायकोकडून हेरगिरी, काळं सत्य कसं आलं समोर?
Bollywood Actor : नवऱ्याच्या काळ्या कृत्यांवर नजर ठेवण्यासाठी बायकोची हेरगिरी, प्रसिद्ध अभिनेत्यानेचे एक नाही तर, प्रत्येक वयातील महिलेसोबत शारीरिक संबंध... धक्कादायक सत्य समोर आल्यानंतर मात्र...

प्रसिद्ध प्रायवेट डिटेक्टिव तान्या पुरी हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची पोलखोल केली आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरच्या केसवर तान्या हिने मोठा खुलासा केलाय. सांगायचं झालं तर, अभिनेत्याच्या पत्नीच्या मॅनेजरने तान्या हिला फोन केला आणि अभिनेत्याबद्दल माहिती गोळा करण्यास सांगितलं. तेव्हा अभिनेत्याने लग्नानंतर एका महिलेसोबत नाही तर, अनेक महिलांसोबत संबंध असल्याचे सत्य समोर आलं. अभिनेता बायकोची फसवणूक करत असल्याचं समोर आलं…
बॉलिवूडमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर सामान्य आहे… तान्या म्हणाली, ‘मला असा वाटतं की बॉलिवूडमध्ये अनेक एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर आहेत. पण लोकं याबद्दल फार काही बोलत नाहीत. सर्वांना आपली स्वतःची प्रतिभा जपायची आहे. आता मी ज्या कपलबद्दल बोलत आहे, त्यांनी 2000 दशकाच्या सुरुवातीच लग्न केलं. तिचा नवरा उघडपणे फसवणूक करतो आणि अनेक तरुण अभिनेत्रींसोबत त्याचे संबंध आहेत. त्याने 2 – 3 सिनेमांमध्ये काम केलं आहेत ज्या दरम्यान त्याच्या अफेअरच्या अफवा पसरल्या.’
‘बायकोला याबद्दल सर्वकाही माहिती होतं. त्याच्या मुलांना देखील सर्वकाही माहिती होतं. त्यांचा बाप बाहेर काय करतो… पण कॅमेऱ्यासमोर ते कायम परफेक्ट कपल असल्याचं भासवत होते. पत्नी शिक्षित आहे, तर पती देसी मुंडा आहे. पण पडद्यामागे पुरुषाचे अनेक महिलांसोबत प्रेमसंबंध असतात. अभिनेत्याच्या पत्नीने मॅनेजरला आमच्याकडे पाठवलं होतं . जेव्हा आम्ही शोध सुरु केला तेव्हा अभिनेत्याचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली.
तान्या पुरी पुढे म्हणाली, जेव्हा त्याच्या पत्नीने त्याला विचारलं, तेव्हा त्याने सर्व काही कबूल केलं. त्याचं वर्तन आधीच विचित्र होतं, अभिनेता अशा ठिकाणी प्रवास करत होता जिथे त्याच्या सिनेमांचं शुटिंग देखील होत नव्हतं. त्याच्या विधानांमध्ये विरोधाभास होता, म्हणून त्याच्या पत्नीला संशय आला आणि तिने आम्हाला कामावर ठेवलं.
‘लग्नाच्या 20 वर्षांनंतर अभिनेत्याच्या पत्नीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. दोघांमध्ये, दुसऱ्याशी लैंगिक संबंध ठेवणं फसवणूक मानलं जात नव्हतं. पण जेव्हा मुले त्यात गुंतली तेव्हा पत्नीचा संयम सुटला. कदाचित वास्तव तिच्यासाठी खूप लाजिरवाणं झालं असेल. तिच्यासाठी, शारीरिक विश्वासघातापेक्षा भावनिक विश्वासघात जास्त गंभीर होता. अखेर अभिनेत्याने स्वतःचं चूक स्वीकारली आणि पुन्हा कधी असं होणार नाही… असं सांगत पत्नीची माफी मागितली…
