आमिर खान खरंच करत होता काँग्रेसचा प्रचार? एक वर्षानंतर मोठी माहिती समोर
अभिनेता आमिर खान याच्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. अभिनेता काँग्रेसचा प्रचार करत असल्याच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे.

Aamir Khan | अभिनेता आमिर खान याच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. गेल्यावर्षी आमिर खान याचा काँग्रेसचा प्रचार करताना एक बनावट व्हिडीओ व्हायरल झालेला. त्या व्हिडीओबद्दल अखेर मोठी माहिती समोर आली आहे. बनावट व्हिडीओ संबंधित पुरावे न सापडल्याने केस क्लोज करण्याचा खार पोलिसांनी निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी काँग्रेसचा प्रचार करताना आमिर याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
गुन्हा घडलाय पण सबंधित विरोधात पुरावे न आढळल्याने पोलिसांकडून केस क्लोज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षी अभिनेता आमीर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यात तो काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करत होता. आमिर खानच्या स्टाफकडून यासंदर्भात खार पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती ज्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय आहे प्रकरण?
लोकसभा 2024 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सेलिब्रिटी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी प्रचार करताना दसले. तेव्हा अभिनेता आमिर खान याचा देखील एक व्हिडीओ तुफान व्हायरल झालेला. मात्र हा व्हिडीओ ‘डीपफेक’ असल्याचं निष्पन्न झालं. आमिरच्याच ‘सत्यमेव जयते’ या शोमधल्या एका क्लिपला एडिट करून हा डीपफेक व्हिडीओ बनवण्यात आला आहे. यावर खुद्द आमिर खान याने स्पष्टीकरण देखील दिलं होतं.
काय म्हणालेला आमिर खान
“गेल्या 35 वर्षांच्या करिअरमध्ये माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध आला नाही. निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमात माझा सहभाग होता. पण मी कोणासाठी कधीच प्रचार केला नाही”, असं स्पष्टीकरण आमिरने दिलं संबंधित डीपफेक व्हिडीओमध्ये आमिर हा भारतीय जनता पार्टीवर टीका करताना आणि काँग्रेस पक्षाचं समर्थन करताना दिसत आहे.
आमिर खान याचं खासगी आयुष्य
आमिर खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेता वयाच्या 60 व्या वर्षी गौरी नावाच्या एका महिलेला डेट करत आहे. आमिर याने स्वतःच्या वाढदिवशी सर्वांसमोर रिलेशनशिपची कबुली देखील दिली. आता दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील केलं जातं. एवढंच नाही तर, वयाच्या 60 व्या वर्षी आमिर तिसरं लग्न करेल का? असा प्रश्न देखील चाहते विचारत असतात.
