AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | पुन्हा एकदा दिसला मल्लिका शेरावतचा बोल्ड अंदाज, ‘पूल’मधील व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ!

अभिनेत्री मल्लिका शेरावत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ही अभिनेत्री आपले बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. आता नुकताच इंस्टाग्रामवर तिने तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक बोल्डनेस दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

Video | पुन्हा एकदा दिसला मल्लिका शेरावतचा बोल्ड अंदाज, ‘पूल’मधील व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ!
मल्लिका शेरावत
| Updated on: May 29, 2021 | 4:52 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) हिने तिच्या अभिनयाने आणि बोल्ड शैलीने ‘मर्डर’ या चित्रपटात अशी जादू केली की, ती आजतागायत अखंड आहे. मल्लिका शेरावत तिच्या चाहत्यांमध्ये नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईलने धुमाकूळ घालत राहिली आहे. मल्लिका शेरावतने तिच्या कारकीर्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकताच मल्लिकाने एक बोल्ड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्विमिंगपूलमध्ये आपला बोल्ड अंदाज दाखवताना दिसली आहे (Mallika Sherawat share bold Pool video on social media).

अभिनेत्री मल्लिका शेरावत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ही अभिनेत्री आपले बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. आता नुकताच इंस्टाग्रामवर तिने तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक बोल्डनेस दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

मल्लिकाचा बोल्ड व्हिडीओ चर्चेत

मल्लिका शेरावतची खास गोष्ट म्हणजे तिने तिच्या करिअरमध्ये मोठ्या आणि छोट्या दोन्ही बजेटच्या चित्रपटांत काम केले आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या पूलमधील आंघोळीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मल्लिकाने शेअर केलेला हा व्हिडीओ रात्री शूट करण्यात आला आहे. यात तीने गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. यासह अभिनेत्रीने तिच्या केसांमध्ये गुलाबी रंगाची फुले माळली आहेत. पूलच्या पाण्यात ती आपला कातिलाना अंदाज दाखवतब आहे. चाहत्यांना देखील आपल्या लाडक्या अभिनेत्रीचा व्हिडीओ खूप आवडला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते त्यावर कमेंट करत तिला प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा मल्लिका शेरावतचा व्हिडीओ

मल्लिकाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती. जाहिरातींमधून तिने या क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर अभिनेत्री ‘जिना सिर्फ मेरे लिये’ यात छोट्याशा भूमिकेत दिसली होती. त्यानंतर ‘ख्वाहिश’, ‘मर्डर’ आणि ‘प्यार के साईडइफेक्ट्स’ हे अभिनेत्रीचे खास गाजलेले चित्रपट आहेत (Mallika Sherawat share bold Pool video on social media).

बोल्ड सीनवर व्यक्त झाली मल्लिका

अलीकडेच अभिनेत्रीने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, चित्रपटातील बोल्ड दृश्यांनंतर लोक तिच्या बद्दल काय विचार करू लागले होते. आता 17 वर्षानंतर अभिनेत्रीने असे म्हटले आहे की, या चित्रपटात बोल्ड सीन दिल्यावर लोकांनी जवळपास तिची नैतिक दृष्ट्या हत्याच केली होती.

मल्लिका शेरावत म्हणाली की, मर्डर फिल्म केल्यावर मला लोकांमध्ये एक खालच्या दर्जाची महिला म्हणून पाहिले गेले होते. जर आज मी या चित्रपटांबद्दल विचार केला तर, आता हे सगळं सामान्य झालं आहे. मात्र, त्यावेळी नव्हतं. कदाचित याचमुळे आता लोकांचा या चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आता सिनेमा काळाबरोबर बदलत चालला आहे. सर्व प्रकारचे चित्रपट लोक पाहतात आणि पसंत देखील करतात.

(Mallika Sherawat share bold Pool video on social media)

हेही वाचा :

Idian Idol 12 | अभिजीत सावंतनंतर मियांग चँगची ‘इंडियन आयडॉल’वर प्रतिक्रिया, कॉन्ट्रोवर्सीबद्दल बोलताना म्हणाला…

Ram Setu | ‘रामसेतु’च्या चित्रीकरणाला ‘या’ दिवशी सुरुवात होणार! कोरोनाला मात दिल्यानंतर अक्षय कुमार कामासाठी सज्ज!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.