रात्री रूममध्ये ये… 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने चक्क मिथुनच्या… धक्कादायक प्रकाराने बॉलिवूड हादरलं

मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्तीने बॉलिवूडमधील कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. एका 65 वर्षीय व्यक्तीने त्याला रात्री घरी बोलावून अश्लील मेसेज पाठवले होते. वडिलांना सांगितल्यावर त्यांनी दुर्लक्ष करण्यास सांगितले. या घटनेने त्याला इंडस्ट्रीची कटू बाजू कळली, जिथे स्टारपुत्र असूनही संघर्ष आणि अशा वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते.

रात्री रूममध्ये ये... 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने चक्क मिथुनच्या... धक्कादायक प्रकाराने बॉलिवूड हादरलं
Mithun Chakraborty
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2026 | 6:21 PM

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना विचित्र अनुभव आले आहेत. कधी निर्माते, दिग्दर्शकांपासून तर कधी सहकालाकारांपासून या अभिनेत्रींना विचित्र अनुभवाला सामोरे जावं लागलं आहे. त्यामुळेच मध्यंतरीच्या काळात मी टू मुव्हेमेंटच्यावेळी अनेकींनी उघडपणे त्यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगांना वाट मोकळी करून दिली होती. त्यामुळे बॉलिवूड हादरून गेलं होतं. केवळ अभिनेत्रींनाच नाही तर अभिनेत्यांनाही असे विचित्र अनुभव आले आहेत. प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशीलाही असाच अनुभव आला होता.

नमाशी हा अभिनेता मिथुन चक्रवती यांचा मुलगा आहे. बॅड बॉय या सिनेमाद्वारे त्याने 2023 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याने द बंगाल फाइल्स, अखिरी सवाल आदी सिनेमातही काम केलं. पण त्याला अजून म्हणावं तसं यश आलेलं नाही. त्याची ओळख निर्माण होईल, असा त्याचा एखादा सिनेमा चालला नाही.

Loading...

अनेकदा रिजेक्ट

स्टारपुत्र असूनही नमाशीचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. बॉलिवूडमध्ये पहिलाा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी त्याला खूप कष्ट उपसावे लागले आहेत. चपला झिजवाव्या लागल्या आहेत. अनेक ऑडिशन त्याने दिल्या होत्या. पण प्रत्येकवेळी त्याला रिजेक्ट केलं जात होतं. एक दोन नव्हे तर 3 वर्ष त्याला स्ट्रगल करावा लागला होता. त्यामुळे त्याला स्टारचा मुलगा असणं आणि सामान्य व्यक्तीचा मुलगा असणं यात किती फरक आहे, हे कळून चुकलं होतं.

त्याला सुरुवातीच्या काळात असंख्य रिअॅलिटी चेक मिळाले. स्ट्रगल करावा लागत असल्याने रिजेक्शन आणि हार्टब्रेक काय असतो हे त्याला कळलं. या काळात खच्चून जाण्याऐवजी तो मानसिकदृष्ट्या स्ट्राँग झाला. नमाशीने या प्रवासात कास्टिंग काउचचाही सामना केला. स्क्रीन अॅवार्ड्स सोबत चर्चा करताना त्याने हा धक्कादायक प्रकार सांगितला. तसेच यावर वडिलांची काय प्रतिक्रिया होती हे सुद्धा सांगितलं.

कास्टिंग काउचमध्ये फसला

मी स्ट्रगलच्या काळात प्रत्येत ठिकाणी ऑडिशनला गेलो होतो. यावेळी मी कास्टिंग काउचमध्ये फसलो. मी कुणाचा मुलगा आहे हे त्या व्यक्तीला माहीत नव्हते. तो अत्यंत विचित्र म्हातारा होता. साधारण 65 वर्षाचा असेल. रात्री 11 वाजता घरी येऊन भेट असं त्याने मला सांगितलं. रात्री घरी आला तरच तुला सिनेमात काम मिळेल. नाही तर नाही मिळणार असं तो म्हातारा म्हणाला. त्याने मला अश्लील मेसेजही पाठवले, असं नमाशी म्हणाला.

मी वडिलांना ही गोष्ट सांगितली. त्यावेळी त्यांनी मला याकडे दुर्लक्ष करायला सांगितले. त्यानंतर मी त्या व्यक्तीला मी कुणाचा मुलगा आहे हे सांगितलं. त्यानंतर तो घाबरला आणि गयावया करू लागला. त्याने माझी माफी मागितली. त्यावेळी माझ्या मनात एक विचार आला, माझ्या जागी सामान्य मुलगा असता तर काय झालं असतं? त्याला मजबुरीने सर्व काही करावं लागलं असतं, असं तो म्हणाला. बॉलिवूडमधला हा माझा सर्वात वाईट अनुभव आहे. कास्टिंग काऊचची प्रकरणं आजही इंडस्ट्रीत होत आहेत. आऊटसाइडर्सवर हे लोक चान्स मारतात, असंही त्याने सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us