Tara Sutaria : आता बॉलिवूडची हॉट अभिनेत्री तारा सुतारियाही सोशल मीडियावर ट्रोल, नेटकरी म्हणाले…

पॅप्सच्या अकाऊंटवर तिचे फोटो शेअर झाल्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. नेटकऱ्यांनी लिहिलं आहे, कोणी तरी तिला कपडे द्या.. (Now Bollywood's actress Tara Sutaria is troll on social media)

Tara Sutaria : आता बॉलिवूडची हॉट अभिनेत्री तारा सुतारियाही सोशल मीडियावर ट्रोल, नेटकरी म्हणाले...

मुंबई : अभिनेत्री तारा सुतारियाचे (Tara Sutaria) चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाल दाखवू शकले नाहीत, मात्र ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या ताराकडे तीन मोठे चित्रपट आहेत ज्यासाठी सध्या ती तयारी करतेय. मात्र सध्या बॉलिवूडच्या सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक असलेली तारा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.

चाहते म्हणाले शर्ट घरी विसरली का?

अलीकडेच ताराला पापाराझींनी मुंबईत त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलं. या दरम्यान, तारानं रिप्ट जिन्स सोबत निळ्या रंगाची ब्रॅलेट म्हणजेच बिकिनी टॉप परिधान केली होती. पॅप्सच्या अकाऊंटवर तिचे फोटो शेअर झाल्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. नेटकऱ्यांनी लिहिलं आहे, कोणी तरी तिला कपडे द्या.. त्यामुळे आता तिच्या ड्रेसींग सेन्सवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एका वापरकर्त्यानं व्हायरल भयानीच्या अकाऊंटवर लिहिलं, ‘कॅज्युअल कपड्यांऐवजी बिकिनी टॉप परिधान, वाह काय फॅशन सेन्स आहे.’ तर दुसऱ्याने कमेंट केली की, ‘मला वाटतं, मॅडम शर्ट घालायला विसरली.’ सध्या नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर अशा कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी ताराला कपडे खरेदी करण्याचा सल्ला दिला आणि कोणी तिला तिच्या ड्रेसिंग सेन्सवर काम करण्यास सांगितलं.

पाहा फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तारा आता नव्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे, तारा सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा डेब्यू चित्रपट ‘तडप’मध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तर सप्टेंबरपर्यंत हा चित्रपट रिलीज होईल अशी चर्चा आहे. त्याचबरोबर ती टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती 2’ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकीही आहे. तारा एक व्हिलन रिटर्न्सचं शूटिंग देखील करत आहे.

संबंधित बातम्या

Malaika Arora : मलायका अरोराचा ग्लॅमरस फोटोशूट, लवकरच झळकणार ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन 2’मध्ये

Happy Birthday Mumtaz | आपल्या जीवाची बाजी लावत मुमताजने वाचवला होता ‘या’ बॉलिवूड सुपरस्टारचा जीव!

Monalisa : मोनालिसाचा हॉट अँड बोल्ड अवतार, स्विमिंग पूल शेजारी केलं खास फोटोशूट

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI