Parineeti-Raghav Video | पाहुण्यांसमोर लिप लॉक करताना दिसले परिणीती आणि राघव, साखरपुड्यातील अत्यंत खास व्हिडीओ पुढे

| Updated on: May 14, 2023 | 8:53 PM

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. नुकताच दिल्ली येथे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा पार पडलाय. चाहते आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची वाट पाहताना दिसत आहेत. साखरपुड्यामधील खास व्हिडीओ व्हायरल झालाय.

Parineeti-Raghav Video | पाहुण्यांसमोर लिप लॉक करताना दिसले परिणीती आणि राघव, साखरपुड्यातील अत्यंत खास व्हिडीओ पुढे
Follow us on

मुंबई : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा साखरपुडा हा काल दिल्लीमध्ये पार पडलाय. गेल्या काही दिवसांपासून परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा हे त्यांच्या नात्यामुळे प्रचंड चर्चेत आहेत. यांना अनेकदा मुंबईमध्ये स्पाॅट केले गेले. मात्र, यांनी कधीच आपल्या नात्यावर काही भाष्य केले नाही. गेल्या काही दिवसांपासून सतत यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगत आहे. काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टमध्ये म्हटले गेले होते की, यांच्या सुपारीचा कार्यक्रम झाला असून मे महिन्यात साखरपुडा होणार आहे आणि लग्न नोव्हेंबरमध्ये होईल. 13 मे रोजी यांचा साखरपुडा (Engagement) दिल्ली येथे अत्यंत राॅयल पध्दतीने पार पडलाय.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यासाठी खास प्रियांका चोप्रा ही देखील भारतामध्ये दाखल झाली. काल रात्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर काही खास पोस्ट शेअर करत साखरपुड्यातील झलक दाखवली. दोघांनीही त्यांच्या रिंगचे फोटो देखील शेअर केले होते. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे जबरदस्त लूकमध्ये दिसत होते.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या पोस्टनंतर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. यांची पहिली भेट ही लंडन येथे झाली. 150 लोकांच्या उपस्थितीमध्ये यांचा साखरपुडा हा पार पडला. बाॅलिवूड ते राजकिय मंडळींनी यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली.

नुकताच सोशल मीडियावर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यामधील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे धमाल करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये हाॅलमधील सर्व डेकोरेशन देखील दाखवण्यात आले असून परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा डान्स करताना दिसत आहेत.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा या व्हिडीओमध्ये अगोदर केक कट करताना दिसले. त्यानंतर प्रेमाने परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा एकमेकांना केक खाऊ घालताना दिसले. या व्हिडीओच्या शेवटी दोघे किस करताना देखील दिसले आहेत. आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.