Video | तंग कपडे घालून प्रीमिअरला पोहचलेली परिणीती Oops Momentची शिकार! आयत्यावेळी अर्जुन कपूर आला मदतीला धावून…

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) ही बॉलिवूडची सर्वात बोल्ड अभिनेत्री मानली जाते. तिला मनोरंजन विश्वात ‘बबली गर्ल’ म्हणूनही ओळखली जाते. पण, ही बबली गर्ल केवळ तिच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे Oops Moment ची बळी ठरली आहे.

Video | तंग कपडे घालून प्रीमिअरला पोहचलेली परिणीती Oops Momentची शिकार! आयत्यावेळी अर्जुन कपूर आला मदतीला धावून...
Parineeti chopra

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) ही बॉलिवूडची सर्वात बोल्ड अभिनेत्री मानली जाते. तिला मनोरंजन विश्वात ‘बबली गर्ल’ म्हणूनही ओळखली जाते. पण, ही बबली गर्ल केवळ तिच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे Oops Moment ची बळी ठरली आहे. एकदा, अभिनेत्रीने इतका घट्ट ड्रेस परिधान केला होता की, तिला या ड्रेस ड्रेसमुळे कॅमेरासमोर शरमेने मान खाली घालावी लागली. मात्र, अशावेळी तिच्या मदतीला अभिनेता अर्जुन कपूर धावून आला.

परिणीती चोप्रा बीटाउनच्या सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. पदार्पणापासूनच, ही अभिनेत्री तिच्या वक्तव्यांमुळे आणि बोल्ड कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. मात्र, अनेकवेळा ती फॅशनच्या बाबतीत अशा चुका करते, ज्यामुळे तिला कॅमेरासमोर लज्जित व्हावे लागते. असेच काहीसे घडले, जेव्हा तिने एका प्रीमिअर सोहळ्याला अतिशय घट्ट ड्रेस परिधान केला होता.

पाहा व्हिडीओ :

ड्रेसमध्ये अस्वस्थ दिसत होती परिणिती!

परिणिती चोप्राने लेव्हेंडर रंगाचा ए-सिमेट्रिकल ड्रेस परिधान केला होता. यात डीप बोट कट नेकलाइन डिझाईन होती. ज्यामुळे पुढच्या बाजूस प्लंगिंग लुक देखील दिसत होता. पुढच्या बाजूला बटन-अप पॅटर्न आणि स्लीव्हजवर लाल, पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाच्या पट्ट्यांसह ड्रेस अधिक खास बनवला गेला. हा ड्रेस परिणीतीच्या फिगरला व्यवस्थित फिट झाला नव्हता. तिने परिधान केलेला हा ड्रेस खूप घट्ट दिसत होता. आपल्या पोशाखात नेहमीच आत्मविश्वास असलेली ही अभिनेत्री यावेळी स्वत: देखील थोडी अस्वस्थ दिसत होती. घट्ट फिटिंगमुळे तिला हा ड्रेस सतत हाताने सावरावा लागत होता आणि यामुळेच तिला Oops Momentला बळी पडावे लागले.

चाहत्यांनाही आवडला नाही परीचा ड्रेस!

जेव्हा सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले, तेव्हा लोकांना या ड्रेसच्या तपशीलांकडे लक्ष द्यायचे नव्हते. या कपड्यांमुळे नाराज झालेल्या चाहत्यांनी परिणीतीच्या या तंग ड्रेस घालण्याच्या निर्णयाला ‘स्लॉपी’ आणि ‘कुरूप’ म्हटले आहे. ‘लक्ष वेधण्याचा स्वस्त मार्ग’ असे म्हणत देखील त्यांनी तिच्यावर टीका केली आहे. लोकांनी परिणीतीला फिगरनुसार ड्रेस परिधान करण्याचा सल्ला दिला होता. खुद्द, अभिनेत्रीच्या चाहत्यांनाही हे कपडे पाहून राग आला आणि त्यांनी अभिनेत्रीला ‘निदान कपडे तरी नीट घाल’ आणि ‘स्टायलिस्ट बदल’ असा सल्लाही दिला होता.

हेही वाचा :

बॉलिवूडची चर्चित नावं, तरी मृत्यूने गाठलं अन् कुणाला कळलंच नाही! ब्रह्माच नाही तर ‘या’ कलाकारांचा शेवटही वेदनादायी!

Ankita Lokhande-Vicky Jain Wedding | लगीन घटीका समीप आली! अंकिता-विकीच्या लग्न सोहळ्याला सुरुवात!


Published On - 1:17 pm, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI