AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan Manager : शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानीची सॅलरी ऐकून बसणार नाही विश्वास!

शाहरुखची मॅनेजर किती कमाई करते याबाबत तुम्हाला माहितीये का? बहुतेक लोकांना माहिती नसेल पण शाहरुखची मॅनेजरची सॅलरी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

Shah Rukh Khan Manager : शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानीची सॅलरी ऐकून बसणार नाही विश्वास!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 07, 2023 | 11:46 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटानं  रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. शाहरुख या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. तसंच शाहरुख चित्रपटांतून मोठी कमाई करतोच. पण शाहरुखची मॅनेजर किती कमाई करते याबाबत तुम्हाला माहितीये का? बहुतेक लोकांना माहिती नसेल पण शाहरुखची मॅनेजरची सॅलरी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

काही महिन्यांपूर्वीच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकला होता.  त्यावेळी एक नाव चांगलंच चर्चेत होतं. ते नाव होतं पूजा ददलानी, जी शाहरुखची मॅनेजर आहे.  पूजा ददलानी नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते.

गेल्या 11 वर्षांपासून पूजा ददलानी शाहरुख खानसोबत काम करत आहे. ती 2012 पाहून शाहरुख सोबत काम करतीये, तेव्हापासून ती सतत त्याच्याशी जोडलेली आहे. विशेष सांगायचं झालं तर या वर्षांत पूजाने केवळ प्रसिद्धीच नाही तर भरपूर संपत्तीही कमावली आहे.  आज ती करोडोंच्या मालमत्तेची मालकीण आहे.

पूजा ददलानीचा पगार किती आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा ददलानीचा एक वर्षाचा पगार 7 ते 9 कोटी इतका आहे.  त्यामुळे ती अतिशय विलासी जीवन जगते.  तसंच, जर तिच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर, 2021 च्या अहवालानुसार, ती 45 ते 50 कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे.

गौरी खानने केलंय तिचं नवीन घर डिझाइन

2023 च्या सुरुवातीला पूजानं एका नवीन घर घेतलं , ज्याची डिझाइन शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केली होती. पूजाने गौरीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना याबाबतची माहिती दिली होती.

पूजा ददलानीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, 2018 मध्ये तिनं हितेश गुरानी नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं होतं. हितेन हा एक बिझनेसमन आहे.  तसंच या दोघांनाही एक मुलगी आहे.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान