कधी ब्रेस्ट साइज बदलतात तर कधी… अभिनेत्री श्रेया सरन AI-मॉर्फ्ड फोटोंवर भडकली

अभिनेत्री श्रेया सरनने एआय तंत्रज्ञानाच्या गैरवापरावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. सेलिब्रिटींच्या फोटो-व्हिडीओला विकृतपणे मॉर्फ करून व्हायरल करण्याच्या वाढत्या घटनांमुळे तिला आणि इतर अभिनेत्रींना त्रास होत आहे. जान्हवी कपूरच्या मॉर्फ्ड व्हिडीओनंतर श्रेयाने म्हटले की, कपडे बदलणे किंवा शरीराचा आकार बदलणे हे असह्य आहे. तंत्रज्ञानाचा असा वापर धोकादायक आहे.

कधी ब्रेस्ट साइज बदलतात तर कधी... अभिनेत्री श्रेया सरन AI-मॉर्फ्ड फोटोंवर भडकली
Shriya Saran
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2026 | 12:17 PM

टेक्नॉलॉजीच्या दुनियेत एआयममुळे मोठी क्रांती झाली आहे. एआयमुळे असंख्य समस्या चुटकी सरश्या सुटत आहेत. मात्र, याच एआयची सेलिब्रिटींना मोठी डोकेदुखी झाली आहे. अभिनेत्रींच्या फोटो आणि व्हिडीओंना अश्लील पद्धतीने क्रिएट करून व्हायरल करण्याचा विकृतपणा वाढत आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर हिचे ‘चुट्टमल्ले’ हे गाणं एआयद्वारे बदलून अत्यंत विकृतपणे व्हायरल करण्यात आलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आता दृश्यम 3ची अभिनेत्री श्रेया सरन हिने या मुद्द्यावरून थेट प्रतिक्रिया दिली आहे. तिने एआयने क्रिएट करण्यात येणाऱ्या फोटो आणि व्हिडीओवर आक्षेप घेतला आहे. कधी शरीराचा आकार बदलला जातो, कधी अंगावरचे कपडेच गायब केले जात आहेत. या सर्व गोष्टी असह्य होत आहेत. वेदनादायी आहेत, त्रस्त करणाऱ्या आहेत. तंत्रज्ञानाचा असा वापर करणं योग्य नाहीये, असं श्रेया सरनने म्हटलं आहे.

अभिनेत्री श्रेया सरनने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एआयच्या होणाऱ्या दुरुपयोगावरून जोरदार टीका केली आहे. अनेकदा फोटो बदलले जातात. त्यामुळे फोटोत दिसणारी महिला तीच आहे की नाही हे समज नाही. शरीराच्या अंगांचा आकार बदलला जातो. कधी ब्रेस्ट साइज बदलली जाते, तर कधी फोटोतील कपडेच हटवले जात आहेत, असं श्रेया म्हणाली.

Loading...

अशा गोष्टींकडे अनेकदा दुर्लक्ष करावं लागत आहे. याचा अर्थ असा नाही की हे सर्व योग्य आहे. हे सर्व त्रास देणारं आहे. ही सामान्य बाब म्हणून स्वीकारता येत नाही, असं श्रेया म्हणाली. यावेळी तिने एआयच्या पॉझिटिव्ह गोष्टीही मान्य केल्या. या तंत्राद्वारे चांगली कामे होऊ शकतात. आपण लोकांची मदत करू शकतो. पण त्याचा चुकीचा वापर धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकतो. प्रत्येक नव्या तंत्रासोबत काही आव्हानेही असतात. लोकांनी काळानुसार त्यावर मात केली पाहिजे, असं श्रेयाने सांगितलं.

जान्हवीच्या व्हिडीओने खळबळ

जान्हवी कपूरच्या ‘चुट्टमल्ले’ या गाण्याला एआयद्वारे विकृत पद्धतीने दाखवण्यात आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यापार्श्वभूमीवर श्रेयाचं हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे. ‘देवरा: पार्ट 1’ च्या या गाण्यात जान्हवीसोबत ज्युनिअर एनटीआर दिसला होता. त्यानंतर हा व्हिडीओ मॉर्फ्ड करून अश्लील पद्धतीने व्हायरल झाला होता. हा अश्लील भाग ओरिजिनल गाण्यात नव्हताच. त्यानंतर 4 ऑक्टोबर 2026 रोजी जान्हवीने इन्स्टावरून या प्रकाराचा निषेध नोंदवला होता. यावेळी ज्युनिअर एनटीआर, चिरंजीवी, विजय देवरकोंडा आणि खुशबू सुंदरसहीत अनेक कलाकारांनी जान्हवीचं समर्थन केलं होतं.

तरच बदल होईल

श्रेयाने नेमकं याच विकृती विरोधात भाष्य केलं आहे. त्याचवेळी फिल्म इंडस्ट्रीत महिलांचं मोठं योगदान वाढत असल्याबद्दल तिने समाधान व्यक्त केलं आहे. आता कॅमेऱ्याच्या मागेही महिला मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. महिला केवळ अभिनयापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. तर, कथेची निवड, सिनेमातील गुंतवणूक आणि रचनात्मक निर्णय घेण्यात महिला महत्त्वाचं योगदान देत आहेत. केवळ महिलांवर सिनेमे बनवून बदल घडून येणार नाही. त्यासाठी सिनेमाची कहाणी लिहिण्यापासून सिनेमात पैसा गुंतवण्यापासून आणि सिनेमा बनवण्यापर्यंतचे निर्णय महिलांच्या हाती गेले पाहिजे. जेव्हा महिला स्वत: निर्णय घेतील, तेव्हात त्यांच्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी, होणारा त्रास मोठ्या पडद्यावर उत्तम पद्धतीने त्या दाखवू शकतील, असंही श्रेयाने म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us