Tiger Shroff : टायगर श्रॉफला ती चूक भोवली..? सर्वात मोठी धक्कादायक अपडेट काय?

प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत गोळीबार झाला, ज्यात त्याचा चालक जखमी झाला. दैव बलवत्तर म्हणून टायगर थोडक्यात बचावला. बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलिसांनी ८ पथके नेमली असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे. बॉलिवूडमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे.

Tiger Shroff : टायगर श्रॉफला ती चूक भोवली..? सर्वात मोठी धक्कादायक अपडेट काय?
tiger shroff
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2026 | 10:08 PM

प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफवर आज संध्याकाळी गोळीबार करण्यात आला आहे. दैव बलवत्तर म्हणून टायगर या हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे. पण त्याच्या ड्रायव्हरला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. त्याच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच या हल्ल्यात एक रिक्षा चालकही जखमी झाला आहे. बाईकवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केला असून या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. या हल्ल्यामुळे बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

कुर्ला, दादर आणि कल्याण…

हा हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ 8 पथके स्थापन केली आहेत. हे आठ पथके आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपीच्या शोधासाठी कुर्ला, वांद्रे, कल्याण आणि दादर रेल्वे स्थानकात पोलिसांची पथकं रवाना झाली आहे. आरोपी मुंबई बाहेर पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांची ही पथके स्थानकांवर रवाना झाली आहेत. तर, खंडणी विरोधी पथकांच्या अधिकाऱ्यांनी नानावटी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. हल्ला कसा झाला? हल्लोखोर कसे दिसत होते? वगैरे माहिती घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच पोलिसांनी टायगर श्रॉफकडेही जुजबी चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे.

Loading...

8 ते 10 गोळ्या झाडल्या?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला गोळीबार झाला त्यावेळी टायगरचा ड्रायव्हर जखमी झाला. त्यावेळी लगेच काही सेकंदात टायगर श्रॉफने ड्रायव्हरला दुसऱ्या सीटवर शिफ्ट करत स्वतः गाडी चालवायला घेतली. पण काहीच सेकंद गाडी पुढे गेल्यावर पुन्हा गाडीवर गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे. एक दोन नाही तर तब्बल 8 ते 10 गोळ्या गाडीवर झाडण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, पोलिसांनी त्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

कोणती चूक भोवली?

टायगर श्रॉफ हा जुहूच्या जमनालाल बजाज ग्राऊंडवर दर रविवारी फुटबॉल खेळायला यायचा असं सांगितलं जात आहे. या ठिकाणी दर रविवारी फुटबॉल खेळायला येणं ही चूक टायरला भोवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, टायगर श्रॉफ या ठिकाणी दर रविवारी यायचा की पहिल्यांदाच आला, याचा तपास पोलीस तपास करत आहेत. तसेच आरोपी नेमक्या वेळी याच ठिकाणी कसे आले? याचाही पोलीस शोध घेत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us