AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff : टायगर श्रॉफला बिश्नोई गँगने आधीच धमकावलं होतं? धक्कादायक अपडेट समोर

अभिनेता टायगर श्रॉफवर जुहूत झालेल्या गोळीबाराने बॉलिवूड हादरले आहे. बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांनी टायगरला आधीच धमकावले असल्याचा दावा केला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. पोलिस १५ पथके लावून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत, ज्यामुळे बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Tiger Shroff : टायगर श्रॉफला बिश्नोई गँगने आधीच धमकावलं होतं? धक्कादायक अपडेट समोर
tiger shroffImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2026 | 9:40 PM
Share

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर जुहूत गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आहे. पण दोन जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एक टायगरचा ड्रायव्हर आहे. त्याच्या डाव्या हाताला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून बॉलिवूड हादरून गेले आहे. या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतल्याने बॉलिवूडमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

टायगर श्रॉफ हा वैयक्तिक कामानिमित्ताने जुहूच्या जमनालाल बजाज ग्राऊंडमध्ये आला होता. तो परतत असताना हा त्याच्या कारवर गोळीबार करण्यात आला. तीन अज्ञात बाईकस्वारांनी हा गोळीबार केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी 15 पथके स्थापन केले असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. जुहू परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, टायगर श्रॉफ दर रविवारी जमनालाल बजाज ग्राऊंडवर फुटबॉल खेळायला येत असतो. फुटबॉल खेळून जात असताना हा गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे.

post

post

जबाबदारी घेतली…

दरम्यान, बिश्नोई गँगचा गँगस्टर अनिल पंडित यांने पोस्ट करून या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. मी आणि हरमन सिंधू या हल्ल्याची जबाबदारी घेत असल्याचं अनिल पंडितने म्हटलं आहे. तसेच आम्ही त्याला समजावलं होतं. पण त्याने ऐकलं नाही, असंही या पोस्टमध्ये पंडितने म्हटलं आहे. म्हणजे या हल्ल्याबाबत अनिल पंडितने आधीच टायगर श्रॉफला सांगितल्याचा अंदाज आहे. बॉलिवूडमध्ये आमचं न ऐकणाऱ्यांना आणि सलमान खान सोबत काम करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आश्चर्य म्हणजे टायगर श्रॉफने सलमान खान सोबत एकही सिनेमा केलेला नाही. तरीही त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नेमकं कोणत्या कारणाने टायगरला टार्गेट करण्यात आलं? हे अद्याप गुलदसत्यात असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच बिश्नोई गँगने जर टायगरला धमकावलं होतं तर टायगरने पोलिसात तक्रार केली होती की नाही? हे सुद्धा अद्याप अस्पष्ट आहे.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,