
Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूर वयाच्या 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली आहे. सोनम आण पती आनंद आहूजा यांनी 29 मार्च 2026 रोजी दुसऱ्या मुलाचं जगात स्वागत केलं आहे… ही आनंदाची बातमी स्वतः सोनम हिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सध्या सर्वत्र फक्त सोनम तिच्या नवजात बाळाची चर्चा सुरु आहे. सध्या सोनम हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोस्ट पाहिल्यानंतर फक्त चाहत्यांनी नाही तर, सेलिब्रिटींनी देखील अभिनेत्रवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सोनम कपूर हिने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली, ‘कृतज्ञता आणि आणि अत्यंत प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने, आम्हाला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की आज, 29 मार्च 2026 रोजी, आमच्या घरी एका चिमुकल्या मुलाचं आगमन झालं आहे. आमचं कुटुंब आता मोठं झालं आहे… वायूने त्याच्या छोट्या भावाचं स्वागत मोठ्या आनंदात केलं आहे… तो देखील प्रचंड आनंदी आहे. आम्ही स्वतःला खूप भाग्यशाली मानतो… कारण छोट्या पाहुण्याने आमचं घर आनंदाने आणि आशीर्वादाने भरलं आहे. एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे आणि आम्ही देवाचे आभारी आहोत. प्रेमासोबत सोनम, आनंद आणि वायू…’, अशी पोस्ट अभिनेत्रीने केली आहे.
2022 मध्ये सोनम पहिल्यांदा झाली आई…
सोनम कपूर हिने 2018 मध्ये उद्योजक आनंद आहूजा याच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले. लग्नानंतर अभिनेत्री अभिनयापासून ब्रेक घेत, खासगी आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं… त्यानंतर 2022 मध्ये सोनम हिने पहिला मुलगा वायू याला जन्म दिला… वायू याच्यासाठी सोनम आणि आनंद यांनी ‘नो फोटो पॉलिसी’ लागू केली आहे…
सोनम कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री अभिनयापासून दूर आहे. पण सोनम सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.