AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharat Ganeshpure : उज्ज्वल निकम यांच्या ‘प्रहार’ सिनेमात दिसणार ‘चला हवा येऊ द्या’ मधील अभिनेता, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Chala Hawa Yeu Dya Fame Actor : राजकुमार रावच्या 'प्रहार' या सिनेमात 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याची वर्णी लागली असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Bharat Ganeshpure : उज्ज्वल निकम यांच्या 'प्रहार' सिनेमात दिसणार 'चला हवा येऊ द्या' मधील अभिनेता, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
| Updated on: Oct 01, 2026 | 2:51 PM
Share

राजकुमार रावच्या बहुप्रतिक्षित कोर्टरूम ड्रामा ‘प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राजकुमार रावनं उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित कायदेशीर लढ्यांभोवती फिरते. हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या सिनेमात सुप्रसिद्ध मराठी अभिनेता ललित प्रभाकरनं अजमल कसाबची भूमिका साकारली आहे. पण, तुम्हाला माहितीये का? ‘प्रहार‘ या सिनेमात ‘चला हवा येऊ द्या‘ फेम अभिनेत्याचीही वर्णी लागली आहे.

‘चला हवा येऊ द्या‘ फेम अभिनेत्याची वर्णी

‘प्रहार‘ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. ललितनं साकारलेल्या कसाबच्या भूमिकेचीही चर्चा होतेय. तसंच या सिनेमात ‘चला हवा येऊ द्या‘ फेम भारत गणेशपुरे यांचीही वर्णी लागली आहे. ‘प्रहार‘ सिनेमात भारत गणेशपुरे यांनी एका वकिलाची भूमिका साकारली आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. भारत गणेशपुरे ‘प्रहार‘ सिनेमात झळकणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कसा आहे ‘प्रहार‘ सिनेमाचा ट्रेलर?

‘प्रहार’ या सिनेमाचा ट्रेलरही मनाला भिडतो. या सिनेमात २६/११ च्या भयानक रात्रीची एक झलक दाखवली आहे. ‘प्रहार ,सिनेमाचा ट्रेलर त्या भयानक दृश्याच्या एका झलकने सुरू होतो. २६ नोव्हेंबरच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील दहशतवादी हल्ल्यात आपल्या आईला गमावलेली एक निष्पाप मुलगी, न्यायालयात दहशतवादी कसाबविरुद्ध साक्ष देते. उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारणारा राजकुमार राव, कसाबला फाशी देण्याचा निर्धार करतो. तो केवळ मुंबईचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. ललितनंही कसाबची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे.

दरम्यान, ‘प्रहार‘ या सिनेमात राजकुमार राव आणि ललित प्रभाकर यांच्यासोबत जयदीप अहलावत, वामिका गब्बी, सिकंदर खेर, आशिष विद्यार्थी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Follow Us
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा