AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chehre Trailer Out | दोन मिनिटांच्या व्हिडीओ केवळ दोन सेकंद दिसला रियाचा चेहरा, पाहा बिग बींच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर…

बॉलिवुडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेता इमरान हाश्मी (Emraan hashmi) यांच्या आगामी ‘चेहरे’ (Chehre) या चित्रपटाची चाहत्यांना आतुरतेने प्रतिक्षा आहे.

Chehre Trailer Out | दोन मिनिटांच्या व्हिडीओ केवळ दोन सेकंद दिसला रियाचा चेहरा, पाहा बिग बींच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर...
अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Mar 18, 2021 | 3:30 PM
Share

मुंबई : बॉलिवुडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेता इमरान हाश्मी (Emraan hashmi) यांच्या आगामी ‘चेहरे’ (Chehre) या चित्रपटाची चाहत्यांना आतुरतेने प्रतिक्षा आहे. हा चित्रपट बर्‍याच दिवसांपासून चर्चेचा भाग बनला आहे. ‘चेहरे’च्या टीझर्स आणि पोस्टर्समधून अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) गायब झाल्यानंतर तिला या चित्रपटातून काढून टाकल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण, आता ट्रेलरमध्ये निर्मात्यांनी अखेर रियाची झलक चाहत्यांना दाखवली आहे. रुमी जाफरी दिग्दर्शित ‘चेहरे’चा ट्रेलर आज (18 मार्च) प्रदर्शित झाला आहे (Chehre Trailer Out Actress Rhea Chakraborty  seen for only 2 seconds).

इमरान हाश्मीने ‘चेहरे’चा ट्रेलर शेअर करताना लिहिले की, ‘दोष सिद्ध होईपर्यंत प्रत्येकजण संशयास्पद आहे. आपण खेळाचा सामना करण्यास तयार आहात? 9 एप्रिल रोजी थिएटरमध्ये पाहा ‘चेहरे’.’

पाहा या चित्रपटाचा ट्रेलर

केवळ 2 मिनिट 22 सेकंदाचा हा ट्रेलर अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने सुरू होईल. अमिताभ बच्चन म्हणतात, ‘अगर आप में से किसी ने कोई अपराध या जुर्म किया है तो बहुत संभलकर यहां से गुजरिएगा. क्योंकि ये खेल आपके साथ भी खेला जा सकता है..’ त्यानंतर इम्रान हाश्मी डोंगरात अडकतो आणि अमिताभ बच्चन यांच्या घरी थांबतो आणि तिथेच त्याच्याबरोबर गुन्हा आणि शिक्षेचा खेळ सुरू होतो. या गेममध्ये इमरान हाश्मी स्वत:च रचलेल्या सापळ्यात अडकतो. ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन यांचे धमाकेदार संवाद ऐकायला  आहेत. तसेच, क्रिस्टल डिसुझा देखील यात दिसली आहे. अखेर या ट्रेलरमध्ये केवळ 2 सेकंद रिया चक्रवर्तीची झलक पाहायला मिळाली.

इमरान हाश्मी आणि बिग बी अभिनित हा चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, त्यानंतर त्याची रिलीजची तारीख 9 एप्रिल करण्यात आली. टीझरच्या रिलीजबरोबर चित्रपटाच्या रिलीजची तारीखही बदलली गेली (Chehre Trailer Out Actress Rhea Chakraborty  seen for only 2 seconds).

गूढ-थ्रिलर चित्रपट

‘चेहरे’ हा एक गूढ-थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन रूमी जाफरी यांनी केले आहे. या वर्षाचा सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट म्हणून ‘चेहरे’चे नाव घेतले जात आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी व्यतिरिक्त अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा, धृतिमान चक्रवर्ती, रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित याच्या मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड केली आहे. हा चित्रपट आता 9 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

कोरोनामुळे चित्रपट लांबणीवर

कोरोना साथीच्या रोगामुळे मागील वर्षी ‘चेहरे’ प्रदर्शित होऊ शकला नाही. चित्रपटाची घोषणा 11 एप्रिल 2019 रोजी झाली होती आणि त्याचे शूटिंग 10 मे रोजी सुरू झाले. गेल्या वर्षी 17 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे रिलीजला ब्रेक लागला.

पोस्टर्सवरून हटवलेल्या रियाला निर्मात्यांची साथ

जेव्हा चित्रपटाच्या पोस्टर्सवर रियाला जागा दिली जात नव्हती तेव्हा बर्‍याच चित्रपट निर्मात्यांनी रियाचे समर्थन केले. एका चित्रपट निर्मात्याने म्हटले होते की, ‘मला नक्कीच रियाबरोबर काम करायचं आहे. ती सुंदर आणि प्रतिभावान आहे आणि आता लोकांनाही तिला मोठ्या पडद्यावर बघायचे आहे. मला तिच्याबरोबर काम करण्यात काहीच अडचण नाही.’

(Chehre Trailer Out Actress Rhea Chakraborty  seen for only 2 seconds)

हेही वाचा :

SSR Drug Case | रिया चक्रवर्तीला कोर्टाचा दिलासा, जामिनाविरोधातील याचिकेवरील पुन्हा सुनावणी होणार!

Jhimma : चला खेळूया ‘झिम्मा’ म्हणत क्षिती जोग झळकणार नव्या भूमिकेत

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली