AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC | ‘तारक मेहता..’च्या ‘या’ दोन ‘परममित्रां’मध्ये झाला मोठा वाद! सेटवर एकमेकांपासून राहतात दूर…

प्रसिद्ध टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka ooltah chashmah) गेले अनेक वर्षे लोकांना मनोरंजनाची मेजवानी देत आहे. या कार्यक्रमातील सगळी पात्र चाहत्यांच्या मनात वसली आहेत.

TMKOC | ‘तारक मेहता..’च्या ‘या’ दोन ‘परममित्रां’मध्ये झाला मोठा वाद! सेटवर एकमेकांपासून राहतात दूर...
तारक मेहता का उल्टा चष्मा
| Edited By: | Updated on: Mar 30, 2021 | 10:23 AM
Share

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ (Taarak Mehta ka ooltah chashmah) गेले अनेक वर्षे लोकांना मनोरंजनाची मेजवानी देत आहे. या कार्यक्रमातील सगळी पात्र चाहत्यांच्या मनात वसली आहेत. मालिकेमध्ये ‘जेठालाल’ आणि ‘तारक मेहता’ यांची मैत्री सर्वांनाच आवडते. या दोघांना पाहून लोकांना जय आणि वीरूच्या मैत्रीची आठवण येते. पण, या दोघांच्या बाबतीत आता एक मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे. वृत्तानुसार, खऱ्या आयुष्यात हे दोन्ही कलाकार म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) आणि शैलेश लोढा (Shailesh Lodha) हे एकमेकांशी बोलत देखील नाहीत (Clashes between Taarak Mehta ka ooltah chashmah fame actor dilip joshi and shailesh lodha).

मैत्रीत पडली फूट!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (तारक मेहता का औलता चश्माह) हा एक असा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये वावरणारे प्रत्येक पात्र लोकांना खरेखुरे वाटू लागले आहे. मात्र, एका प्रसिद्ध वेबसाईटच्या वृत्तानुसार, तारक मेहता आणि जेठालाल अर्थात दिलीप जोशी आणि शैलेश लोढा यांच्या मैत्रीमध्ये काही वाद झाल्याने फूट पडली आहे. दोघांमधील संभाषण बर्‍याच दिवसांपासून पूर्णपणे बंद आहे. एकत्र शूटिंग करतात, मात्र हे दोघेही एकमेकाशी अजिबात बोलत नाहीत.

एकमेकांशी झालेत वाद

बातमीनुसार या दोघांची ही मैत्री केवळ शुटिंगच्या वेळी आणि पडद्यावरच पाहायला मिळते. वास्तविक जीवनात दोघेही एकमेकांशी बोलणेही पसंत करत नाहीत. दिलीप जोशी आणि शैलेश लोढा यांच्यामध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाल्याचे कळते आहे. त्याच वेळी, काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यातील हे वाद आताचे किंवा नवे नाहीत, तर फार पूर्वीपासून हे दोघे एकमेकांशी बोलत नाहीत. पण, याचे खरे कारण अद्याप कोणालाही माहिती नाही. सेटवरही हे दोघे एकमेकांपासून अंतर ठेवून वावरताना दिसतात (Clashes between Taarak Mehta ka ooltah chashmah fame actor dilip joshi and shailesh lodha).

यापूर्वीही वाद आलेले समोर!

मालिकेतील वाद समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही असेच वाद समोर आले होते. मात्र, काम आणि वैयक्तिक आयुष्य वेगवेगळे ठेवून यातील कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. यापूर्वीही ‘बबिता’ साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि दिलीप जोशी यांच्याविषयी अशीच एक बातमी समोर आली होती.

प्रेक्षकांच्या भेटीला येणार अ‍ॅनिमेटेड तारक मेहता

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका आता अ‍ॅनिमेटेड मालिकेत रुपांतरित होत आहे. यंदाच्या एप्रिलमध्ये ‘सोनी याय’ या वाहिनीवर अ‍ॅनिमेटेड ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका दाखवली जाईल. यामध्ये ‘जेठालाल’, ‘दया’, ‘बापूजी’ आणि ‘टप्पूसेना’ या लोकप्रिय पात्रांना पुन्हा एका उत्तम अवतारात दाखवले जाईल.

(Clashes between Taarak Mehta ka ooltah chashmah fame actor dilip joshi and shailesh lodha)

हेही वाचा :

Holi 2021 | पडद्यावर होळीची धूम माजवणारे ‘हे’ कलाकार प्रत्यक्षात मात्र रंगांपासून राहतात दूर!

‘हॅलो, मी बाबुराव बोलतोय…’ हे गाणं विठ्ठल उमपांकडे कसं आलं?, आधी कुणी गायलं?; वाचा, मजेदार किस्सा!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.