माधुरी दीक्षितकडे मागितले चक्क तिचे 40 मिमी केस; ‘कोण होणार करोडपती’मध्ये अभिनेत्रीला बसला धक्का, स्पर्धकाला घातली अट
Madhuri Dixit: स्पर्धकाची भन्नाट मागणी, माधुरीचा आश्चर्यचकित झालेला चेहरा आणि तिने घातलेली अट यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. तिची इच्छा नेमकी कोणती, हे जाणून घेण्यासाठी हा भाग पाहावा लागणार आहे.

Madhuri Dixit: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्विझ शो ‘कोण होणार करोडपती’मध्ये ज्ञानासोबतच मनोरंजनाचीही मेजवानी प्रेक्षकांना मिळत असते. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित या पर्वाचं सूत्रसंचालन करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तिच्या उपस्थितीमुळे हे पर्व आधीच चर्चेत असताना आता नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये एका स्पर्धकाने केलेल्या भन्नाट मागणीने कार्यक्रमात रंगत आणली आहे. या स्पर्धकाने चक्क माधुरी दीक्षितचे 40 मिमी केस विग बनवण्यासाठी मागितले आहेत. ही अनपेक्षित मागणी ऐकून माधुरीलाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, तिनेही लगेच एक मजेशीर अट घालत स्पर्धकाला प्रतिप्रश्न केला. त्यामुळे या खास भागात नेमकं काय घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
विग बनवण्यासाठी माधुरीकडे मागितले केस
माधुरी दीक्षित ही तिच्या सौंदर्यामुळे, नृत्यामुळे आणि अभिनयामुळे अनेक दशकांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तिच्या हेअरस्टाइलपासून ते फॅशनपर्यंत अनेक गोष्टींचं चाहते अनुकरण करत असतात. मात्र, ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर एका स्पर्धकाने केलेली मागणी काहीशी वेगळीच होती. या स्पर्धकाला विग बनवण्यासाठी माधुरीचे 40 मिमी केस हवे होते. ही मागणी ऐकताच माधुरीला आश्चर्य वाटलं. एखाद्या चाहत्याने आवडत्या अभिनेत्रीच्या सौंदर्याचं कौतुक करणं किंवा तिच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त करणं स्वाभाविक आहे. पण थेट तिचे केसच मागितल्यामुळे कार्यक्रमातील हा प्रसंग विशेष ठरला. आता माधुरी या मागणीला काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पहा व्हिडीओ-
माधुरीनेही घातली मजेशीर अट
स्पर्धकाची मागणी ऐकल्यानंतर माधुरी दीक्षितनेही आपल्या खास अंदाजात त्याला उत्तर दिलं. तिने या मागणीवर थेट नकार देण्याऐवजी एक मजेशीर अट घातली. “पण त्याबदल्यात तुम्हालाही माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल,” असं माधुरीने म्हटलं. माधुरीची ही अट ऐकल्यानंतर तिची इच्छा नेमकी काय असणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. स्पर्धकाला माधुरीच्या केसांची गरज का आहे आणि त्याबदल्यात अभिनेत्री कोणती इच्छा पूर्ण करून घेणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. या संवादामुळे कार्यक्रमात हलकाफुलका आणि मनोरंजक क्षण अनुभवायला मिळणार आहे.
‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम ज्ञान, सामान्यज्ञान आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम आहे. स्पर्धकांना प्रश्नांची उत्तरं देत मोठी रक्कम जिंकण्याची संधी मिळते. त्याचबरोबर कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांमुळे अनेक मजेशीर आणि अविस्मरणीय क्षणही पाहायला मिळतात. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता सोनी मराठी आणि Sony LIV वर प्रसारित होतो.