AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हर हर महादेव चित्रपटावर राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि मनसे एकमेकांना भिडले, पाहा कुठे काय घडलं

नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल येथील चित्रपटगृहात हर हर महादेव चित्रपट सुरू करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आग्रही मागणी केली जात असून जो पर्यन्त शो सुरू होत नाही तोपर्यंत जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

हर हर महादेव चित्रपटावर राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि मनसे एकमेकांना भिडले, पाहा कुठे काय घडलं
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Nov 08, 2022 | 5:14 PM
Share

नाशिक : हर हर महादेव चित्रपटावरुन नाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. नाशिकच्या सिटी सेंटर मॉल येथील चित्रपट गृहात हर हर महादेव हा चित्रपट दाखवू नये यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष नाशिकच्या वतिने निवेदन देण्यात आले आहे. असं असतांना तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने हर हर महादेव चित्रपट दाखवावा यासाठी आग्रही मागणी करण्यात येत आहे. एकाच चित्रपट गृहाच्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकाच ठिकाणी आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतल्यावर त्याला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. याशिवाय संभाजी ब्रिगेड या संघटनेने देखील पाठिंबा दिला असून ठिकठिकाणी हर हर महादेव चित्रपट बंद पाडला जात आहे. तर नाशिकमध्ये चित्रपटगृहाच्या चालक-मालक यांनी धास्ती घेतली असून हर हर महादेवचे शो बंद करण्यात आले आहे. नाशिकमध्ये याच कारणावरून राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.

नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल येथील चित्रपटगृहात हर हर महादेव चित्रपट सुरू करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आग्रही मागणी केली जात असून जो पर्यन्त शो सुरू होत नाही तोपर्यंत जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतिने हर हर महादेव चित्रपट दाखवू नये त्यामध्ये इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला जात असून चित्रपट दाखवू नका अन्यथा निदर्शने केली जाईल असा इशारा दिला आहे.

नाशिकच्या चित्रपट गृहात कुठेही हर हर चित्रपट उपलब्ध नसून चित्रपटगृहाच्या मालक-चालक यांनी धास्ती घेतली आहे, राज्यातील वातावरण बघता खबरदारीचा उपाय म्हणून हे शो बंद ठेवल्याची माहिती आहे.

ठाणे येथील चित्रपट गृहात झालेला राडा बघता नाशिकमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलीसांनी घटना स्थळी धाव घेत हे वातावरण शांत केले आहे.

हर हर चित्रपट गृहात राज ठाकरे यांनी व्हॉईस दिला असल्याने मनसेने यामध्ये उडी घेतली असून हर हर चित्रपट सुरू करण्याबाबत आग्रह केला जात आहे. या मागणीला मात्र राष्ट्रवादी कॉँग्रेसने विरोध दर्शविला आहे.

Follow Us
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?