
लोकप्रिय अभिनेता प्रभास याचा बहुप्रतिक्षित चित्रपट “द राजा साब” हा काल, म्हणजेच 9 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र अभिनेत्याचे अनेक चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. मात्र त्याच्या एका अति उत्साही चाहत्याने असं काही केलं ती ज्यामुळे सगळेच चक्रावले. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो पाहून लोक हैराण झाले आहेत. खरं तर, प्रभासचा चित्रपट कसाही असला तरी त्याचे चाहते त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या आवडत्या कलाकाराला पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. एका व्हायरल व्हिडिओने याचे उदाहरण दिलं. ओडिशातील एका सिनेमागृहात द राजा साबचा शो सुरू असताना चक्क कॉन्फेटी (रगीत कागद) जाळण्यात आली.
आग लावण्याचा व्हिडीओ व्हायरल
व्हायरल झालेला व्हिडिओ ओडिशातील अशोका थिएटरमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.काही प्रेक्षक चित्रपट पाहत होते, मात्र त्यातील काही लोक हे त्याच स्क्रीनसमोर उभं स्पष्ट दिसत आहे, तर काही लोक स्क्रीनसमोर उभे राहून कॉन्फेटी (रंगीत कागद) पेटवताना दिसले. मात्र हा व्हिडीओ होताच लोक हैराण झाले. अनेकांनी थिएटरमधले ते दृश्य पाहून, सुरक्षेची चिंता व्यक्त केली. तर काही लोकांनी थेट त्या चाहत्यांवरच टीका केली असून अशा घटनांमुळे जीव धोक्यात जाऊ शकतो असं सुनावलं.
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
ही आहे प्रभासच्या फॅन्सची मॅच्युरिटी, मी फॅन्सबद्दल बोलतोय. या लोकांनी असं करायला नको होते, जरा मोठ्या लोकांसारखं, समजूतदार माणसांसारखं वागा की. तु्म्ही प्रभासचं नाव खराब करत आहात असं एकाने सुनावलं. या सगळ्य़ा गोष्टींवर बंदी घातली पाहिजे. हे भयानक आहे, खतरनाक आहे, जीवाला धोका पोहोचू शकतो, असं दुसऱ्या चाहत्याने लिहीलं.
‘द राजा साब’ची स्टारकास्ट
‘द राजा साब’ हा चित्रपट मारुती यांनी लिहीला असून त्यांनीच दिग्दर्शन केलं आहे. पीपल मीडिया फॅक्टरी आणि आयव्हीवाय एंटरटेनमेंट यांनी त्याची निर्मिती केली आहे. कलाकारांमध्ये संजय दत्त, बोमन इराणी, निधी अग्रवाल, मालविका मोहनन (ती तेलुगु चित्रपटात पदार्पण करत आहे), रिद्धी कुमार आणि जरीना वहाब यांचा समावेश आहे.