AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dawood Ibrahim : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडालेला दाऊद इब्राहिम, निर्मात्याला गमवावा लागला जीव, काय घडलेलं?

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिम एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेला. तिच्यासाठी निर्मात्यालाही आपला जीव गमवावा लागला. काय घडलेलं जाणून घ्या.

Dawood Ibrahim : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडालेला दाऊद इब्राहिम, निर्मात्याला गमवावा लागला जीव, काय घडलेलं?
| Updated on: Oct 04, 2026 | 4:50 PM
Share

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांचे एकेकाळी जवळचे संबंध होते. सेलिब्रिटींची अंडरवर्ल्डशी मैत्री होती आणि त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यांच्यात मैत्री किंवा वैर नसतानाही, अंडरवर्ल्डसोबतची मैत्री अनेक सेलिब्रिटींसाठी महागडी ठरली आहे. एका निर्मात्यानं अभिनेत्रीला आपल्या सिनेमात घेण्यास नकार दिल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. या अभिनेत्रीचं नाव अनिता अयुब असून ती एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे.

अनिता अयुब मूळची पाकिस्तानी आहे. पाकिस्तानात शिक्षण घेतल्यानंतर, ती मॉडेलिंग करण्यासाठी भारतात आली. तिथं अनेक जाहिराती आणि मॉडेलिंग केल्यानंतर, अनितानं बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिनं देव आनंद यांच्या ‘प्यार का तराना’ या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. अभिनेत्रीनं ‘गँगस्टर’ या चित्रपटातही देव आनंद यांच्यासोबत काम केलं.

दाऊदसोबतचं अफेअर

अनिताला प्रसिद्धी मिळत असतानाच, दाऊद इब्राहिमसोबत तिचं नाव जोडलं गेलं. दाऊद अनिताच्या सौंदर्यानं इतका भारावला होता की, त्यानं निर्मात्यांवर तिला चित्रपटांमध्ये घेण्यासाठी दबाव टाकला. जेव्हा निर्माता जावेद सिद्दीकी यांची हत्या झाली, तेव्हा हे प्रकरण अधिकच चिघळलं. असं म्हटलं जातं की, सिद्दीकी यांनी अनिताला त्यांच्या चित्रपटात घेण्यास नकार दिला होता आणि त्यामुळे दाऊदनं निर्मात्याला संपवलं. कोणताही ठोस पुरावा सापडला नसला तरी, भीती आणि वादामुळे चित्रपटसृष्टीनं तिच्यापासून स्वतःला दूर करण्यास सुरुवात केली.

अनिता तिच्या चित्रपटांपेक्षा इतर गोष्टींमुळे जास्त चर्चेत राहिली आहे. तिच्यावर भारतात पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याचाही आरोप होता. एका पाकिस्तानी मासिकानं असा दावा करत सांगितले की, लोकांचा असा विश्वास होता की, अनिता एक पाकिस्तानी गुप्तहेर आहे. यामुळे तिच्यावर बॉलिवूडमधून बहिष्कार टाकण्यात आला. अनितानं अखेरीस भारत सोडण्याचा निर्णय घेतला. तिनं भारतीय वंशाचे गुजराती व्यावसायिक सौमिल पटेल यांच्याशी लग्न केलं आणि न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाली, पण, हे लग्न अयशस्वी ठरलं आणि नंतर तिनं पाकिस्तानी व्यावसायिक सुबक मजीदसोबत लग्न केलं. आज, अनिता अयुब प्रसिद्धीपासून दूर असून ती सोशल मीडियावर सक्रिय नाही किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दिसत नाही.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात